Vijay Wadettiwar|Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar: 'सरकार फक्त टक्केवारी, डेंटर घेण्यात व्यस्त; शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम सुरू', विजय वडेट्टीवार संतापले!

Maharashtra Politics: राज्यातील अनेक भागांमध्ये झालेली दुष्काळाची परिस्थिती आणि पुणे पोर्शे अपघातावरुन विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

माधव सावरगावे, औरंगाबाद

छत्रपती संभाजीनगर, ता. ३० मे २०२४

'मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. गेल्यावेळी राज्यातील शेतकऱ्यांचा अवकाळी पावसामुळे आणि प्रचंड गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. पंचनामे होतात मात्र शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, असे म्हणत शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, मोफत बि- बियाणे द्यावे,' अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"मराठवाड्यात दुष्काळाने शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला उध्वस्त करण्याचे काम झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1561 गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या सर्व परिस्थितीमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात झालेल्या आहेत," असे आरोप विजय वडेट्टीवार यांनी केले.

"हे सरकार फक्त टक्केवारी आणि टेंडर घेण्यामध्येच व्यस्त आहे. त्यांनी निवडणुकीचे आणि आचारसंहितेचे कारण सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम केलेले आहे. दुसरीकडे मात्र निवडणूक आयोगाकडे परवानगी मागून 25000 कोटीचे टेंडर काढले. शेतकरी आणि सामान्य जनता दुष्काळात पडत असताना इतका बेशरमपणा या सत्ताधाऱ्यांनी केला आहे," असा घणाघातही विजय वडेट्टीवार यांनी केला.

यावेळी पुण्यातील पोर्शे कार अपघातावरुनही विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. घटना घडल्यानंतर आठ तास गुन्हा दाखल होत नाही रक्ताचे नमुने बदलले जातात हे सगळे आपण बघितले. त्यामध्ये पोलीस आणि आरोग विभाग हा कुठल्यातरी राजकीय दबावाला बळी पडत आहे. मग या प्रकरणातील सत्यता नेमकी पोलिसांनी काय शोधली? असा खोचक सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Health Tips: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

China: तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये मुलांना 'या' अनोख्या गोष्टी शिकवल्या जातात

Viral Video: नजर हटी दुर्घटना घटी! बोटीवर चालता चालता तरुणाचा गेला तोल अन्...पाहा पुढे नेमकं काय घडलं

CM Shinde: मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, पण...,CM पदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT