Vijay Wadettiwar News: 'चुकीच्या धोरणामुळेंच तणावाची परिस्थिती', मराठा- ओबीसी वादावरुन विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा!
Maharashtra Politics Latest News: राज्यात Saam TV
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar News: 'चुकीच्या धोरणामुळेंच तणावाची परिस्थिती', मराठा- ओबीसी वादावरुन विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा!

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, शिर्डी|ता. २० जून २०२४

एकीकडे सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा रान उठवले असतानाच आता ओबीसी बांधवही आक्रमक झाले आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि उपोषणाला बसलेत. या उपोषणाचा आठवा दिवस असून हाके यांची प्रकृती खालावल्याचे दिसत आहे. यावरुनच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"राज्यातील सामाजिक सलोखा उध्वस्त करण्याचे काम फडणविसांचे सरकार करत आहे. सत्तेच्या लालसेपोटी विविध समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आता समाजा समाजामध्ये सरकार वाद वाढवत असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे," असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला.

"संविधानात जे आरक्षण ओबीसींना मिळाल आहे, त्याचं संरक्षण हवं अशी हाके यांची मागणी आहे. मात्र आग लावता येते, विझवायला वेळ जातो. सरकारने एका माचिसने महाराष्ट्रात आग लावून टाकली. सरकार मराठा आणि ओबीसी दोघांनाही फिरवण्याचे काम करत आहे, या पद्धतीमुळे यांचा भुईसपाट होईल," असा टोलाही वडट्टीवार यांनी लगावला.

"लोकांचे पक्ष फोडा, यंत्रणांचा गैरवापर, हे सोडून यांना काहीच कळत नाही. नीट परीक्षेत गोंधळ झाला. उद्या भलतेच MBBS झाले तर भविष्यात काय होईल? नीटच्या परीक्षेत दरवर्षी काहीतरी घोळ होतो याबाबत सरकारने जबाबदारी घ्यायला हवी. या संदर्भात SIT स्थापन करून चौकशी करा," अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान...! जास्त प्रमाणात मिठ खाल्यामुळे होतात गंभीर आजार; जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Marathi Live News Updates : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार अर्थसंकल्प

Sonakshi Sinha: लग्नानंतर सोनाक्षी प्रेग्नेंट? का होतेय अशी चर्चा

Ranbir Kapoor : बालपणीच्या कोणत्या आठवणीमुळे रणवीर कपूर आजही होतो डिस्टर्ब ? स्वत:च केला खुलासा

VIDEO: जिल्ह्यात 6 विधानसभेत स्वतंत्र उमेदवार उभे करणार, Ravikant Tupkar यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT