Nashik Breaking News: मोठी बातमी! ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणेंच्या गाडीवर हल्ला, मोठा दगड टाकून काच फोडली

Maharashtra Breaking News: शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीची काच फोडण्यात आली.
Nashik Breaking News: मोठी बातमी! ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणेंच्या गाडीवर हल्ला, मोठा दगड टाकून काच फोडली
Maharashtra Breaking News: Saamtv

नाशिक, ता. २० जून २०२४

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात लोकांनी रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभे असलेल्या गाडीवर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Breaking News: मोठी बातमी! ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणेंच्या गाडीवर हल्ला, मोठा दगड टाकून काच फोडली
Nashik Accident Video: सिन्नर- शिर्डी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव पिकअप उलटले, २ महिला मजूरांचा मृत्यू; २० जखमी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात लोकांनी रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर हल्ला केला. यावेळी मोठ्या दगडाने त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली.

याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी देखील बाळा कोकणे यांच्यावर असाच जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्यांची गाडी फोडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Nashik Breaking News: मोठी बातमी! ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणेंच्या गाडीवर हल्ला, मोठा दगड टाकून काच फोडली
Uddhav Thackeray : शिवसेनेचं नाव,पक्ष चिन्ह न वापरता लढून दाखवा, भरसभेत उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला ओपन चॅलेंज, Video पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com