जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक विधान केले होते. 'धर्म विचारून गोळ्या घालण्या इतपत दहशतवाद्यांकडे वेळ असतो का?', असं विधान वडेट्टीवार यांनी केले होते. या विधानानंतर वडेट्टीवार यांच्यावर सत्ताधारी जोरदार टीका करत आहेत. आता विजय वडेट्टीवार यांनी या विधानावर स्पष्टीकर देत सरकारवर टीका केली आहे. ' आपलं अपयश लपवण्यासाठी सरकारने माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवले.', असं म्हणत वडेट्टीवार यांनी पहलगाव हल्ल्यावरील वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.
विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, 'नितेश राणे यांनी काय म्हटलं त्याकडे मला लक्ष देण्याची गरज नाही. काल मी जे बोललो ते तोडून मोडून दाखविण्यात आलं. भारताला आपापसात लढविण्याचे षडयंत्र पाकिस्थानने रचले आहे. पहिल्यांदा दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. सरकार आपलं अपयश लपविण्यासाठी माझं वक्तव्य तोडा मोड करून दाखविले गेले. माझं वक्तव्य मागून पुढून न दाखविता तोडून मोडून दाखवण्यात आलं.' वक्तव्याचा विपर्हास केला गेला असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
'देशांमध्ये कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला. आमची भूमिका स्पष्ट आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी जी भूमिका मांडली ती आमच्या पक्षाची भूमिका आहे. काल बोललो की अतिरेक्यांना पहिल्यांदा एवढा वेळ मिळाला. त्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. तेवढेच दाखविण्यात आले. माझं पूर्ण वक्तव्य दाखवा ही विनंती आहे.', असं देखील विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
अपयश लपवण्यासाठी माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते म्हणाले की, 'अतिरेक्यांना पाकिस्तानने शिकवून पाठवलं. देशात यादवी व्हावी म्हणून धर्म विचारून मारण्यात आलं. देशाच्या सर्वभौमतेला, अखंडतेला खिंडार पाडण्यात त्यांना यश मिळवायचं होतं त्यामुळे त्यांनी असा कट रचला. अतिरेक्याला कुठला धर्म नसतो असं मी बोललो. हा भारताला कमजोर करण्याचा हल्ला होता. २६ वर्षानंतर पर्यटकांवर झालेला हल्ला आहे हे अपयश लपविण्यासाठी माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं.'
तसंच, 'ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला माझ्या बोलण्याने त्यांच्या भावना दुखावल्या असतील. कुटुंबांना वेदना झाला असतील तर मी माफी मागतो. माझी विनंती आहे की माझं भाषण पूर्ण दाखवा. अर्धवट भाषण दाखवून सरकारचे अपयश लपवू नका. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये ही माझी भूमिका स्पष्ट आहे. अतिरेकी पहिल्यांदा धर्म विचारतात. अतिरेक्यांना इतका वेळ मिळाला दोन धर्मात भांडण लावलं जात हे पहिल्यांदा केलं जात आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.