Vijay Vadettiwar : गरज सरो वैद्य मरो.. अशी अवस्था लाडक्या बहिणीची झाली; विजय वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर निशाणा

Nagpur News : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची छाननी करून निकषात न बसणार्यांचे अर्ज आता बाद केले जात आहेत. यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा
Vijay Vadettiwar
Vijay VadettiwarSaam tv
Published On

पराग ढोबळे 
नागपूर
: गरज सरो आणि वैद्य मरो या युक्तीप्रमाणे भाजप आणि त्यांचे सरकार लाडक्या बहिणींना फसवत आहे. निवडणुकीच्या तोंडावर ऍडव्हान्समध्ये पैसे टाकणाऱ्यांची निती का भ्रष्ट झाली. पैसे नव्हते, तरतूद होती तर ऍडव्हान्समध्ये पैसे मते घेण्यासाठी टाकले का? आता लाभार्थींची नावे २५ टक्केपर्यंत आणतील. तसेच संजय गांधी निराधार महिलेला फक्त पाचशे रुपये मिळणार. खरंतर केंद्र सरकारकडून संजय गांधी श्रावण बाळ निधी मिळतो. गरिबांची आधार महिलांना सुद्धा सोडायचं नाही अशा पद्धतीचे प्लॅनिंग केले असल्याचे सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची छाननी करून निकषात न बसणार्यांचे अर्ज आता बाद केले जात आहेत. यामुळे लाडक्या बहिणींना या  योजनेचा लाभ मिळणार नाही. यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधत लाडक्या बहणीनी जागा दाखवावी; असे देखील ते म्हणाले. 

Vijay Vadettiwar
Jalna Police : जालन्यात देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बहुमत असताना भांडण कशासाठी?
सरकार अस्तित्वात आहे का? केवळ दिवस मला काम करताना दिसत आहे. बाकीचे सर्व मंत्रिमंडळ झाल्यासारखं दिसून येत आहे. मंत्राच्या चेहऱ्यावर मंत्री होण्याचा आनंद दिसत नाही. प्रचंड बहुमत असताना भांडण कशासाठी? पालकमंत्री पदावरून जिल्हा लुटाण्यासाठी चढाओढ आणि स्पर्धा आहे. जनतेला लुटून काम करायची, असे या भांडणांवरून दिसत आहे. एकीकडे अजित पवार धर्मनिरपेक्ष म्हणतात खरं अजित पवार यांना त्याचा अर्थ कळला आहे. कारण इतके वर्षे काँग्रेससोबत होते. दुसरीकडे ते जातीयवादी धर्मांध पक्ष सोबत जाऊन बसले. 

Vijay Vadettiwar
Ulhasnagar News : चूक नसतानाही दंड भरतोय दुचाकी मालक; उल्हासनगरातील अजब प्रकार, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

राज्यात किळसवाणा प्रकार सुरु 
प्रत्येक बाबतीत कुरघोडी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिला. मात्र ती स्वच्छता कुठून करतात यावर लक्ष ठेवावे लागेल. स्वच्छता ठेवतात की स्वच्छ करतात की साफ करतात. याचा अर्थ वेगवेगळे आहे. शिंदेपासून याची सुरुवात कदाचित झाली असावी. त्या गोष्टीत मतभेद मनभेद सुरू असून हा किळसवाणा प्रकार राज्यात सुरू आहे. वाद वाढल्यानंतर शेवटी दिल्लीत अमित शहा उरतात. अमित शहा यांनी सुद्धा शिंदेंना कमिटमेंट केल्याचे आता शिंदेच्या तोंडून बाहेर पडत आहे. त्यावर काय तोडगा काढतात का याकडे आमचं लक्ष राहील.

तर तो महाराष्ट्राचा अपमान 

आग्र्यात स्मारक बांधू ही कल्पना चांगली आहे. पण अरबी समुद्रासारखे होऊ नये. अरबी समुद्र स्मारक प्रत्यक्षात यावे. कृतीत घडावं अशी अपेक्षा करतो. कारण शिवाजी महाराजांच्या ३५५ व्या जयंतीनिमित्त केलेली घोषणा आहे. तसे झाले नाही तर महाराष्ट्रात अपमान करणारे जर कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस असतील. 

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा विषय येतोच. उद्या दाऊद इब्राहिमचे बॅनर लावले जातील. महाराष्ट्रातही गुंड पोसले जात आहे. सत्ता धरणारऱ्यांच्या मर्जीने खूप गुंड माजले आहे. कायदा सुव्यवस्थेचा बट्याबोळ झाला आहे. खुलेआम आमदार गोळीबार करत आहे. आमदारावर गोळीबार होत आहे. राजकीय नेत्यांचा खून झाला आहे. सरकारला याचं गांभीर्य कळत नाही हे दुर्दैवी आहे. तसेच  मला वाटते नितेश राणे यांना महाराष्ट्राचे योगी व्हायचे आहे. महाराष्ट्रातला योगी होण्यासाठी ज्या गोष्टी घडत नाही. त्यावर ते बोलत आहेत. नितेश राणेच्या वक्तव्याला फार काही महत्त्व देण्याची गरज नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com