Ulhasnagar News : चूक नसतानाही दंड भरतोय दुचाकी मालक; उल्हासनगरातील अजब प्रकार, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

Ulhasnagar : गाडीला दंड लागल्याचे मेसेज कारीरा यांना दर महिन्याला येतात. मात्र दंडाच्या पावतीसोबत आलेला फोटो ओपन करून पाहिला असता त्याच नंबरची मरून रंगाची बर्गमॅन स्कुटर दिसते
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv
Published On

उल्हासनगर : वाहतुकीचे नियम मोडतोय एक जण आणि त्याचा दंड भरतोय दुसराच. असा प्रकार आता उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. वाहतूक विभागाचा दंड भरून मोटरसायकल चालक हैराण झाला असून त्याच्या तक्रारीकडे मात्र वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. 

उल्हासनगर कॅम्प २ मध्ये राकेश कारीरा नामक राहत असून त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाची मोपेड दुचाकी आहे. या गाडीला दंड लागल्याचे मेसेज कारीरा यांना दर महिन्याला येतात. मात्र दंडाच्या पावतीसोबत आलेला फोटो ओपन करून पाहिला असता त्याच नंबरची मरून रंगाची बर्गमॅन स्कुटर दिसते. त्यामुले कारीरा यांच्या गाडीचा नंबर लावून बर्गमॅन चालक गाडी चालवत असल्याचं समोर आले आहे. अर्थात हा धक्कादायक प्रकार काय आहे; हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.  

Ulhasnagar News
Central Railway : मुंबईकरांची लाईफलाईन विस्कळीत, मध्य रेल्वेवर खोळंबा, डाऊन दिशेच्या गाड्या ठप्प

काही दिवसांपूर्वी रिक्षाचा प्रकार आला समोर 

उल्हासनगर वाहतूक विभागाने काही दिवसांपूर्वी एकाच क्रमांकाच्या रिक्षा पकडून बनावट नंबर प्लेट लावणाऱ्यावर कारवाई केली होती. यामध्ये देखील वाहतुकीचे नियम मोडणारा वेगळाच आणि दंड भरण्याचे काम मूळ रिक्षा मालक करत असल्याचे समोर आहे होते. पण पुन्हा असाच प्रकार दुचाकीबाबत समोर आला आहे. आता कारीरा यांच्या तक्रारीची दखल मात्र पोलीस घेत नसल्यानं कारीरा त्रासले आहेत.

Ulhasnagar News
Jalna Police : जालन्यात देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही 

दरम्यान कल्याण परिसरात गाडीला दंड लागत असून २०२२ पासून हा दंड मात्र कारीरा यांना भरावा लागत आहे. याबाबत त्यांनी वाहतूक पोलिसांकडे देखील तक्रार केली आहे. पण पोलिसांकडून योग्य सहकार्य आणि प्रतिसाद मिळत नसल्याची कारीरा यांची तक्रार आहे. यामुळे करीरा यांना आणखी किती दिवस असा दंड भरावा लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com