Jalna Police : जालन्यात देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalna News : जालना शहरात देखील पुन्हा एकदा दारूची वाहतूक केली जात असताना पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे यामुळे दारू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले
Jalna Police
Jalna PoliceSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: अवैधपाने दारूची वाहतूक व विक्री केली जात आहे. अशाच प्रकारे जालना शहरात देखील वाहतूक केली जात असताना जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत देशी आणि विदेशी दारूचा साथ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत साधारण १९ हजार ९६० रुपये किंमतीच्या १७१ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

आजही अनेकदा अवैधपणे दारूची वाहतूक व विक्री केली जात आहे. पोलिसांच्या नजर चुकवून हि वाहतूक होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यानुसार जालना शहरात देखील पुन्हा एकदा दारूची वाहतूक केली जात असताना पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे दारू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

Jalna Police
MAHARERA Scam : महापालिका अधिकारी सहभागी असल्याशिवाय घोटाळा होऊच शकत नाही; माहिती अधिकार कार्यकर्ते घाणेकर यांचा आरोप

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

जालना शहरात अवैधरित्या देशी व विदेशी दारूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिस पथकाने शहरातील तीन वेगवेगळ्या भागांत कारवाई करून देशी व विदेशी दारूच्या १७१ बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Jalna Police
Dharashiv News : शिवजयंती रॅलीत फटाक्यांचा स्फोट; २ जण जखमी, वाशी तालुक्यातील घटना

वणीत लाखो रूपयांची सुगंधित तंबाखू जप्त
यवतमाळ
: यवतमाळच्या वणी येथील सिंधी काॅलनीत लाखो रूपयांचा सुगंधित तंबाखू साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी छापा टाकून एक लाख सहा हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केल्याची कारवाई केली. सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करणाऱ्या रोहित तारुणा राहणार गुरुनानक नगर वणी याला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com