Vijay Wadettiwar  Saam TV
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : लग्नासाठी त्यांनी हुंडा मागितला...; प्रकाश आंबेडकरांच्या टिकेला वडेट्टीवारांचं सडेतोड प्रत्युत्तर

Political News : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर काँग्रेसचा प्रस्ताव म्हणजे वराती मागून घोडं अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती.

Ruchika Jadhav

Vijay Wadettiwar On Prakash Ambedkar :

हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होतं ते त्यांना मिळालं नाही, त्यामुळे चर्चा न करता त्यांनी लग्न मोडलं. किती जागा हव्यात त्यासाठी चर्चा करायची होती, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर काँग्रेसचा प्रस्ताव म्हणजे वराती मागून घोडं अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती. त्यावर त्यांना प्रत्युत्तर देताना वड्डेटीवार म्हणाले की, "साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही त्यांना पसंत केलं होतं. त्यांनी का लग्न मोडलं हे त्यांचं त्यांना माहिती. कदाचित त्यांना हुंड्यामध्ये जे काही अपेक्षित होतं ते न मिळाल्यामुळे त्यांनी लग्न मोडलं असावं. त्यांनी याबाबत चर्चा केली पाहिजे होती."

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

महाविकास आघाडीत काहीच ताळमेळ नाही. एक म्हण आहे मराठीत वराती मागून घोडं. वरात पुढे निघून गेलेली असताना त्या घोड्याचा काय उपयोग आहे. हे नाना पटोलेंना उत्तमरित्या शोभतं, असं प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या प्रस्तावावर बोलले होते.

पंतप्रधान मोदी आगामी निवडणुच्या पार्श्वभूमिवर सध्या चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. त्यावरून देखील वड्डेटीवारांनी विरोधकांवर टीका केली.भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता टिकवण्यासाठी कितीही सभा घेतली तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही. विजय महाविकास आघाडीचाच होईल. लोकं त्यांना ऐकायला जातात, पण मतदान करत नाही, अशी टीका वड्डेटीवार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेत मराठी माणूस पंतप्रधान? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा|VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर, सांगोल्यात मोठी राजकीय घडमोड

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या शिवणगाव मध्ये पुन्हा भूकंप सदृश्य धक्के

Maharashtra Politics: महापालिका निवडणूक जाहीर होताच ठाण्यात राजकीय भूकंप, महायुतीतला प्रमुख पक्ष फुटणार

क्रीडामंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले?

SCROLL FOR NEXT