Akola Vidhan Sabha Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Vidhan Sabha Election 2024: अकोल्यात महायुतीमध्ये वादाचे संकेत, शिंदेंच्या जागेवर भाजपने ठोकला दावा

Priya More

अक्षय गवळी, अकोला

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. अकोला जिल्हा हा राजकीयदृष्ट्या सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाचा जिल्हा आहे. अकोला जिल्ह्यात जागा वाटपावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. कारण अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघापैकी चार जागांवर सध्या भाजपचे आमदार आहेत. तर बाळापूर विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचा आमदार आहे. भाजपने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटानं बाळापूरसह अकोट विधानसभा मतदारसंघाची मागणी केल्याने दोन्ही पक्षात जागा वाटप करून मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

बाळापूर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी बाळापूर मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी पक्षाकडे बाळापुरातून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासोबतच पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रामेश्वर पवळ यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे एक राज्य समन्वयक असलेले नरेश मस्के खासदार झालेले असताना दुसऱ्या राज्य समन्वयकांना शिंदे विधानसभेची उमेदवारी देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

रामेश्वर पवळ यांनी सांगितले होते की, मतदारसंघावर दावा करणे हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. मात्र महायुतीतील जागावाटप हे पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतूनच होणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील बाळापूर आणि रिसोड या तीन मतदारसंघावर आमचा दावा, असेही त्यांनी सांगितले होते. बाळापूर हा आमचा नैसर्गिक दावा असलेला मतदारसंघ आहे. पक्षाने आपल्याला संधी दिली तर निश्चितच बाळापुरातून विजयश्री खेचून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी मतदार संघात कोणताही विकास केला नाही. नितीन देशमुख यांचा राजकारण ब्लॅकमेलिंगचं प्रयत्न असणार आहे. त्यांच्याकडे कोणत्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप असतील त्या त्यांनी खुशाल लोकांसमोर आणाव्यात, असेही रामेश्वर पवळ यांनी स्पष्टपणे सांगितले.

कोण आहेत रामेश्वर पवळ?

एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ते राज्य समन्वयक आहेत. रामेश्वर पवळ हे 1990 पासून राजकारणात आहे. अकोला, वाशिम आणि बुलडाणा हे तिन्ही जिल्हे राजकीय कार्यक्षेत्र राहिले आहेत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केलं आहे. राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीत असताना राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांना पक्षात आणण्याचं काम त्यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT