Vidhan Parishad Election Result  Saam Digital
महाराष्ट्र

vidhan parishad election result : विधान परिषदेत भाजपचे पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके विजयी

Vidhan Parishad Election Result Live : विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके विजयी झाले आहेत.

Sandeep Gawade

विधान परिषदेच्या निवडणुकीचा पहिले दोन निकाल भाजपच्या बाजूने लागले आहेत. भाजपच्या पंकजा मुंडे आणि योगेश टिळेकर हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. योगेश टिळेकरांना पहिल्या पसंतीची २३ मतं पडली. तसेच परिणय फुके देखील विजयी झाले आहेत. भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी आतापर्यंत तीन उमेदवार निवडून आले आहेत.

अजित पवार गटाने दोन उमदेवार दिले होते. त्यांच्या दोन्ही उमदेवारांचा विजय झाला आहे. शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांना पहिल्या पसंतीची २३ मतं मिळाली आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची ८ मतं फुटल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निवडणकीत पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा पहायला मिळाला आहे. शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलेलं नाही. उद्धव ठाकरे यांनाही शिंदे यांचं एकही मत फोडता आलेलं नाही.

विधानपरिषद निवडणुकीमध्ये परिणय फुके यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या नागपूरमधील हिल टॉप येथे निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून वर्णी लागल्यानंतर मुंडे समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या विजयी झाल्या. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव झाला होता. त्यानंतर नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुतीतही त्यांचा पराभव झाला. आता तब्बल 5 वर्षांनी त्या पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

परिणय फुके यांचा 2019 च्या निवडणुकीत साकोली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. याआधी ते फडणवीस सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. योगेश टिळेकर 2019 च्या निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्याचाही या निवडणुकीत विजय झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT