Devendra fadnavis  Saam
महाराष्ट्र

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत ६ जागांसाठी भाजप कुणाला देणार संधी; 'या' १२ जणांची नावं चर्चेत

Maharashtra Vidhan Parishad election 2026 BJP candidate list: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले आहेत. ६ जागांसाठी भाजपकडून १ उमेदवार निश्चित झाला आहे तर उर्वरीत ५ जणांची नावं आज निश्चित केली जाणार आहेत.

Priya More

Summary -

  • विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

  • ६ जागांसाठी १२ इच्छुकांची नावं चर्चेत

  • वर्षा बंगल्यावर कोअर कमिटीची आज रात्री महत्त्वाची बैठक

विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाकडून कुणाला संधी द्यायची यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपच्या कोअर कमिटीची आज रात्री १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे. भाजपच्या वाट्याला येणाऱ्या ६ जागांसाठी जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या ६ जागांसाठी भाजपकडून १२ जणांची नावं चर्चेत आहेत. हे १२ जण कोण आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

आज भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला असलेल्या ६ जागांसाठी कुणाला संधी द्यायची यावर चर्चा होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजच्या बैठकीतील चर्चेनंतर भाजपकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार आहे. प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. तर इतर नावांची शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे केली जाईल. बैठकीत जातीय आणि प्रादेशिक समतोलावर विशेष भर दिला जाणार आहे.

विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला १० पैकी ६ जागा मिळणार आहेत. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर इतर ५ जणांच्या नावांवर बैठकीत चर्चा होणार आहे. या ५ जणांची नाव फायनल करताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत संधी मिळावी यासाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी इच्छुकांकडून प्रयत्न सुरू आहेत. इच्छुक असलेल्यांनी सह्याद्री अतिथीगृह आणि काल मुंबईतील मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. भाजपच्या ६ जागा असल्या तरी देखील या जागांसाठी १२ नावांची चर्चा होत आहे. यामध्ये माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी यांच्या नावांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, आज खरेदीचा 'गोल्डन चान्स'; 18K, 22K आणि 24K चे दर किती?

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Solapur : नवऱ्याने बायकोला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, एकांतात बोलायचे सांगून खोलीत नेलं, नंतर...

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ कसं जायचं? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

SCROLL FOR NEXT