Vidhan Parishad Maharashtra Election : विधान परिषदेसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election) भाजपने आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. भाजपकडून तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी यांना भाजपकडून विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election 2025) उमेदवारी देण्यात आली आहे. रविवारी सकाळी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून तीन जणांची यादी प्रसारित करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे. त्याआधी भाजपकडून तीन जागांची घोषणा करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक एक जागा आली आहे. आज दोन्ही पक्षांकडून आपले उमदवार जाहीर कऱण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या उपस्थित आज राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये विधान परिषदेसाठीच्या एका जागेवर शिक्कामोर्तब होईल, असे सागण्यात येत आहे.
दादाराव केचे यांच्या बद्दल थोडक्यात माहिती -
आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांचं नाव भाजपकडून विधानपरिषद करिता आज जाहीर करण्यात आले. दादाराव केचे यांचं नाव जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. केचे यांची विधानसभेत उमेदवारी कापून सुमित वानखेडे यांना देण्यात आली होती. त्यामुळे केचे नाराज होते. उमेदवारी नाकारल्यामुळे केचे बंडाच्या तयारीत होते. पण अमित शाह यांनी बावनकुळे यांच्यासोबत त्यांना बोलवत समजूत घातली होती. केचे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत.
संदीप जोशी यांच्या बद्दल थोडक्यात माहिती?
संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे बालपणीचे मित्र आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना असताना त्यांचे मानद सचिव म्हणून नागपुरातील देवगिरी या निवासस्थानी ते कामकाज पाहत होते. युवा मोर्चापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची पद भूषवली आहे यासोबतच सामाजिक कार्यातही त्यांची मोठी कामगिरी आहे. पदवीधर मतदार संघातून 2020 मध्ये त्यांनी निवडणूक सुद्धा लढवली होती. मात्र त्यावेळी ते पराभूत झाले आणि त्यांच्याऐवजी काँग्रेसचे अभिजीत वंजारी हे विजयी झाले होते. मागील विधानसभा निवडणुकीच्या काळातही त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती कार्यकर्त्यांनी त्यावेळेस मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा व्यक्त केली होती...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.