VIDEO Saam Digital
महाराष्ट्र

VIDEO : चालक, क्लिनरसह पुराच्या पाण्यात ट्रक गेला वाहून; थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद

Nagpur Flood : नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला आहे. या घटनेत ट्रक चालक आणि क्लिनरही वाहून गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

Sandeep Gawade

नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला आहे. उमरेड सिर्सी हिंगणघाट मार्गावर ही दुर्घटना घडली आहे.ट्रकमध्ये २ जण असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ट्रक रिकामा असून पुलावरून ४ फूट पाणी असूनही चालकाने ट्रक पाण्यातून चावण्याचं धाडस केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.

नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नांद धरणातून पाण्याचा मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरू असून नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान चिखलापार गावातील पुलावरून आज साडेचार वाजता ट्रक वाहून गेला आहे. स्थानिक नागरिकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये शूट केला आहे. दरम्यान नदीच्या दोन्ही काठांवर ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा काहीच शोध लागला नाही. या घटनेची माहिती बेला पोलिसांना नागरिकांनी दिली आहे.

पुरात वाहून गेली कार

चंद्रपूरमध्ये पुराच्या पाण्यातून कार चालवणं चांगलंच महागात पडलं आहे. शहरातील महाकाली कॉलरी भागाला जोडणाऱ्या झरपट नदीच्या कमी उंचीचा पूलावरून कार घातली होती . अत्यंत खळाळणारा प्रवाह दिसत असतानाही या कारमधील दोघांनी कार पुढे दामटली, मात्र अर्ध्या रस्त्यात कार हेलकावे घेऊ लागली. थोड्या वेळातच कार पुलावरून खाली कोसळली. कारमधील दोघांनी कारचा दरवाजा उघडून कसाबसा झाडाचा आधार घेतल्याने थोडक्यात बचावले आहेत.

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात नऊ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सुमारे बाराशे मिलिमीटर वार्षिक पर्जन्य सरासरी असलेल्या या जिल्ह्यात आजच्या दिवसांपर्यंत 70 टक्के पाऊस पडला आहे. यामुळे नदी, नाले व धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान पुराच्या पाण्यात वाहनं घालू नका, असं आवाहन केल्यानंतरही अशा घटना वारंवार घडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT