school timing change  Saam tv
महाराष्ट्र

School Timing Change: मोठी बातमी! शाळेच्या वेळेत बदल; जिल्हाधाऱ्यांकडून शाळांना कडक आदेश

school timing change update : नागपुरात शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे.

Vishal Gangurde

विदर्भात उष्णतेची लाट

नागपुरातील शाळांच्या वेळेत बदल

पुढील २४ तास विदर्भात असणार उष्णतेची लाट

राज्यातील विविध जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे विदर्भातील विविध जिल्ह्यांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. तर मागील काही दिवसांत उष्माघातामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने शाळेच्या वेळेत मोठा बदल केला आहे.

नागपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतला आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळेत मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांसाठी नवीन वेळ सकाळी ७:०० ते १०:३० अशी निश्चित करण्यात आलीये. जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ नुसार आदेश जारी केला आहे.

हवामान विभागाने काय म्हटलं?

हवामान विभाग तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी म्हटलं की, 'देशभरात सर्वाधिक तापमान विदर्भात नोंदवले गेले आहे. यात अकोला, अमरावती आणि वर्धा हे देशाच्या सर्वाधिक तापमान असलेल्या शहराचा यादीत पोहचले आहेत. आज विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्ध्याला उष्णतेसाठी 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे 47 टक्के तापमान नोंदवले गेले आहे. आजही सूर्याची झळ बसणार आहे. त्यामुळे 29 आणि 30 मे रोजी काहीसा दिलासा मिळणार आहे'.

'24 तासानंतर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्यामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळेल. मात्र मे महिन्यात पुन्हा उष्ण दिवस एप्रिल प्रमाणेच असणार आहे. मागील 10 वर्षात सर्वाधिक तापमान हे यंदा एप्रिल महिन्यात नोंदवल्या गेले आहे, असेही हवामान विभागने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

अंगात ताप असताना आंघोळ करावी का? काय सांगतात तज्ज्ञ?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! गौरी आगमनाच्यावेळी खात्यात ₹1500 जमा होणार? वाचा...

LPG Cylinder Booking Rule : गॅस सिलिंडर बुकिंगचा नियम पुन्हा बदलला; आता दुसरा सिलिंडर किती दिवसांनी बुक करता येणार?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या ‘चलो मुंबई’च्या घोषणेला महिलांचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT