vidarbha latest news Saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

vidarbha latest news : आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शेतकरी आत्महत्येची वेळा का आली, असा सवाल कडू यांनी केला.

Saam Tv

नेते आश्वासन देऊन पाठ दाखवणार असतील, तर पाठीवर दणका कसा द्यायचा हे आम्हाला ठाऊक नसल्याचे बच्चू कडू म्हणाले.

सरकार कोणाचेही असो, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकतीने उभे राहणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.

शुभम देशमुख, साम टीव्ही

राज्यात सरकार कोणाचेही असो, ते आपले असो की परके, आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, कारण शिवसेनेचा डीएनए हा आंदोलनाचा आहे,असा आक्रमक इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. शिवसेना-प्रहार कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

आमदार बच्चू कडू यांनी स्थानिक प्रशासकीय ढिसाळपणावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मी नुकताच गोंदिया दौऱ्यावरून आलो असून तिथे अजूनही धानाची खरेदी पूर्ण झालेली नाही, अर्ध्याहून अधिक धान खरेदी विना पडून आहे. शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळालेला नाही. एवढेच नाही तर एकीकडे एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली असली, तरी काही ठिकाणी बहिणींचे अर्धे पैसे गायब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी जर लोकांना वाट पाहावी लागत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही.शेतकरी आणि गरिबांच्या विविध प्रलंबित मागण्यांवरून त्यांनी प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला.

धानाचा बोनस, घरकुलांचे पैसे आणि लाडक्या बहिणींचे रखडलेले मानधन ३१ जूनपर्यंत सरकारने दिले नाही, तर गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा तीव्र 'भगवा मोर्चा' काढण्यात येईल,असा इशारा त्यांनी दिला. प्रसंगी मुख्यमंत्र्यांचा फोन आला तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन पावले मागे हटणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव न घेता निशाणा साधला.आम्ही जेव्हा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी विधानसभेवर आंदोलन केले होते, तेव्हा बावनकुळे यांनी आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन हवेतच विरले. जर नेते शब्द देऊन पाठ दाखवणार असतील, तर त्यांच्या पाठीवर कसा दणका द्यायचा हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे," असा टोला त्यांनी लगावला.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे असतानाही आज विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. छत्तीसगडमध्ये धानाला ३,१०० रुपये भाव मिळतोय, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २,३०० ते २,८०० रुपयांवर का समाधान मानावे लागते? सत्तेत आहोत म्हणून आम्ही यावर गप्प बसणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जळगाव- सिन्नरकडून येणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची जोरदार धडक; 12 जखमी

Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्या ७ राशींसाठी भाग्याची, बक्कळ पैसा मिळणार; तुमची रास यात आहे का?

Smartphone Explode : पावसाळ्यात स्मार्टफोनचा कधीही होऊ शकतो स्फोट, चुकूनही करू नका 'ही' १ चूक

IBD symptoms: अचानक ही 5 लक्षणं दिसली तर समजा आतड्यांना सूज आलीये!

India-China Border : मोठी बातमी! अरुणाचल सीमेवर भारत आणि चीनचे सैन्य भिडले; ६ वर्षांनंतर पुन्हा ठिणगी

SCROLL FOR NEXT