उपाध्यक्षपदी व दोन विषय समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबार उपाध्यक्षपदी व दोन विषय समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार?

दुपारी तीन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व दोन विषय समिती सभापतींचे रिक्त पद भरण्यासाठी २५ ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना काँग्रेसची सत्ता कायम आहे. उपाध्यक्ष व सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेतील ११ सदस्यांचे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन सदस्यत्व रद्द झाले होते. यामुळे या गटातील सदस्यत्वासाठी नव्याने पोटनिवडणूक घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. मात्र कोरोनामुळे सदरची निवडणूक लांबणीवर पडली. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सदर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल देखील बदलले आहे.

हे देखील पहा -

सन २०१९ मध्ये जि.प. निवडणूक झाल्यानंतर त्यात भाजपा व काँग्रेसच्या प्रत्येकी २३ तर शिवसेनेच्या ७ व राष्ट्रवादीचे ३ सदस्य निवडून आले होते. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजपाच्या ७, काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी २ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. पोटनिवडणूकीनंतर भाजपाचे ४, काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी ३ तर राष्ट्रवादीचा १ सदस्य विजयी झाला आहे. यामुळे आता नंदुरबार जि.प. मध्ये सद्यस्थितीत काँग्रेस सर्वाधिक २४, भाजपा २०, शिवसेना ८ तर राष्ट्रवादी ३ असे पक्षीय बलाबल आहे.

दरम्यान, आज जि.प. उपाध्यक्ष व दोन विषय समिती सभापतींच्या निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. यामुळे नेमके उपाध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा ऍड. राम रघुवंशी यांच्या गळ्यात पडते की अन्य काही? तसेच विषय समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लागते? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जि.प.च्या विषय समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीतर्फे ही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुळजाभवानी मंदिराच्या खजिन्यात मोठी भर; दोन वर्षांत ४९ किलो सोनं दान|VIDEO

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, ४ दिवसांपूर्वी झाली होती निवड; राजकीय घडामोडींना वेग

Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

Maharashtra News Live Update: श्रीरामपूर येथील भोंदू अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

SCROLL FOR NEXT