Manasvi Choudhary
डायबिटीज हा पूर्वी वयोवृद्धांना होणारा आजार होता. मात्र सध्या बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तरूणवायतही उद्भवू लागला आहे.
डायबिटीज झाल्यानंतर रक्तातील साखर वाढते यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. यासाठी रूग्णांनी आहारात बदल करणे महत्वाचे आहे.
डायबिटीजच्या रुग्णांनी मसूरच्या डाळीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. मसूर डाळ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
मसूरच्या डाळीत ग्लायसेमिक इंडेक्स हा सर्वात कमी असते. तसेच डाळीमध्ये फायबर आणि प्रोटीन गुणधर्म असतात.
मसूरच्या डाळीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
मसूर डाळीमध्ये कमी फॅट्स असल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.