Vegetable price hike Saam
महाराष्ट्र

Vegetable Prices: पावसाचा फटका! भाज्यांचे भाव कडाडले, ग्राहकांच्या खिशाला कात्री; शेवगा १५० तर, शिमला मिरची...

Heavy Rainfall Hits Vegetable Market: चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, बाजारात येणाऱ्या भाज्यांची आवक घटली असून, दर दुप्पट झाले आहेत.

Bhagyashree Kamble

विकास मिरगणे, साम टीव्ही

राज्यात पावसाने धडक एण्ट्री केली. चार दिवसांपूर्वी पावसाने जोरदार बँटींग केली, यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाली आहे. अनेकांचं काही प्रमाणात नुकसानही झालंय. आता याचा थेट फटका शेतकऱ्यांनाही बसतो आहे. आधीच अवकाळी पावसामुळे काही भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अशातच चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा थेट परिणाम भाजीपाला बाजारावर झाला आहे.

पाण्याने नुकसान झाल्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. साधारणतः एपीएमसी मार्केटमध्ये दररोज येणाऱ्या ७०० गाड्यांची संख्या आता फक्त ४३७ वर आली आहे. त्यामुळे पुरवठा कमी झाल्याने भाजीपाला दर दुप्पट वाढले आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला होतो. याशिवाय बाजारात आलेला भाजीपाला पावसामुळे भिजल्याने लवकर खराब होत आहे. परिणामी खरेदीदार त्रस्त झाले असून, विक्रेत्यांनाही तोटा सहन करावा लागत आहे.

किरकोळ बाजारातील भाजीपाला दर (प्रति किलो)

भाजीपाला किंमत

शेवगा 150 – 160

शिमला मिरची 100 – 110

फ्लॉवर 120 – 130

गवार 120 – 130

टोमॅटो 50 – 60

वांगी 60 – 70

गाजर 60 – 70

काकडी 60 – 70

भेंडी 80 – 90

कारली 80 – 90

पालेभाज्यांचा जुडी दर

कोथिंबीर – ₹50

मेथी – ₹50

पालक – ₹50

भाजीपाल्याची वाढती दरवाढ सामान्य ग्राहकांच्या खिशावर भार टाकत आहे. पुरवठा सुरळीत होईपर्यंत दर काही दिवस असेच राहण्याची शक्यता आहे.

अकोल्यात ज्वारी पिकाचे मोठे नुकसान

मान्सूनपूर्व पावसाने अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः ज्वारी पिकावर या पावसाचा जबरदस्त परिणाम झाला असून, हाता तोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावून नेला आहे. काळवंडलेल्या ज्वारीच्या कणसांना पावसामुळे कोंब फुटले असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

हिंगणी गावातील युवा शेतकरी तुषार कोरडे यांचे ज्वारीचे पीक पूर्णतः खराब झाले आहे. त्यांनी मेहनतीने वाढवलेले पीक अवकाळी पावसामुळे मातीमोल झाले असून, त्यांच्या श्रमावर पाणी फिरले आहे. अशा प्रकारे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करताना काय काळजी घ्याल?

Raj Thackeray: 19 ऑक्टोबरला 'राज'कीय बॉम्ब फोडणार? राज ठाकरे युतीची घोषणा करणार?

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना केली अटक

Bihar Election: भाजपनं ५ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लावलं प्रचाराच्या कामाला; बिहार निवडणुकीत महाराष्ट्रातील ३ नेत्यांवरही मोठी जबाबदारी

Diwali 2025: कमी बजेट… अफलातून सजावट! दिवाळीत घर सजवण्यासाठी हे सोपे उपाय वापरून बघा

SCROLL FOR NEXT