Vegetables Price In Mumbai Saam Tv
महाराष्ट्र

Vegetable Price Hike: भाज्या कडाडल्या; महागाईने त्रस्त सर्वसामान्यांचा खिसा आणखी रिकामा होणार

परतीच्या पावसामुळे शेतीचं झालेलं नुकसान या दरवाढीचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : महागाईने (Inflation) आधीच त्रस्त नागरिकांना भाज्यांच्या दरवाढीचा (Vegetables Price) फटका बसत आहे. गेल्या काही दिवसात भाज्यांच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांच्या घराचं बजेटवर परिणाम होतोत. परतीच्या पावसामुळे शेतीचं झालेलं नुकसान या दरवाढीचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतही भाज्याचे दर 20-25 टक्क्यांनी वाढले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील शेतीला परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी या संकटात मोठ्या प्रमाणावर भरडले गेले. याचा परिणाम आता सर्वसामान्यांना सोसावा लागणार आहे. मात्र आवक घटल्याने आता भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना सोसावा लागणार आहे. (Latest News Update)

नाशिकच्या भाजीपाल्याचा मुंबईत देखील मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला जातो. तर या वाढत्या भाजीपाल्याच्या किमतीचा परिणाम हा मुंबई मार्केटवर देखील होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवर देखील या महागाईचा परिणाम होणार आहे.

नाशिकमध्ये भाजीपाला दरात झालेली वाढ

>> मेथी जुडी- 50 ते 60 रुपये मार्केट दर तर किरकोळ दर 70 ते 80 रुपयांवर

>> कोथिंबीर- 40 ते 50 रुपये मार्केट दर तर किरकोळ बाजारातील दर 70 ते 80 रुपयांवर

>> टोमॅटो 40 ते 50 रुपये मार्केट दर तर किरकोळ तर 70 ते 80 रुपयांवर

>> भेंडी - 40 ते 50 रुपये मार्केट दर तर किरकोळ दर 70 ते 80 रुपयांवर

>> वांगी- 50 ते 60 रुपये मार्केट दर तर किरकोळ दर 70 ते 80 रुपयांवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ChatGPT 80s Photo Trend: ८०s रेट्रो लूकची क्रेझ वाढली; व्हायरल ट्रेंड 'असा' करा ट्राय

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

मनुस्मृतीविरोधी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्याची प्रकृती बिघडली; तातडीनं रुग्णालयात दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, ८ व्या वेतन आयोगात ४० वर्षे जुना नियम बदलणार

Pune : धुक्याची चादर अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, पावसाच्या सरींमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT