Vanchit Bahujan Aghadi
Vanchit Bahujan Aghadi Saam tv
महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aghadi : तरुणांची लग्न करणं हेच माझं लक्ष्य; वंचितच्या उमेदवाराची अफलातून घोषणा

भारत नागणे

Ramesh baraskar News :

राज्यात दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, हमीभाव या सारखे कळीचे आणि महत्त्वाचे अनेक प्रश्न समोर आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने सर्व प्रश्नांना बगल देत, थेट लग्न न झालेल्या तरूणांची लग्न करणं हा माझा समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची अफलातून घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.‌

वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारस्कर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे ते आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मतदार संघातील लग्नाळू तरूणांच्या समस्येवर भाष्य केलं.

माढा लोकसभा मतदारसंघासह राज्यभरातील तरुणांची वेळेवर लग्न होत नाही. त्यांची ही आजही मोठी समस्या आहे. अनेकांची 35 - 40 वर्षे उलटून गेली आहेत. तरुणांची लग्न होत नाहीत. त्यांच्या लग्नाची ही समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, अलीकडेच त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर लग्नाळू तरूणांचा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता थेट त्यांनी निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दा बनवला आहे. त्यांच्या या घोषणेची मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने हकालपट्टी केली आहे. त्यांनी महाविकास आघाडीकडे माढ्यातून उमेदवारीची मागणी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal News : "मी कोणत्याही पक्षात जाणार नाही!" छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ यांची शिवसेनेत घरवापसी होणार?

Pune Car Accident Video: पुण्यात चाललंय काय?, भरधाव कारने एकाला चिरडले; अपघात CCTV मध्ये कैद

Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार? महायुतीतील आमदारांची मागणी?

Chhagan Bhujbal: 'मी कुठल्याही पक्षात जाणार नाही', ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं वृत्त छगन भुजबळांनी फेटाळलं

SCROLL FOR NEXT