VASANT MORE BLASTS GOGAWALE OVER OCCULT RITUALS AND MISOGYNISTIC POLITICS Saam
महाराष्ट्र

Politics: ओम फट स्वाहाss..! भरत गोगावलेंच्या घरी अघोरी पूजा; ठाकरेंच्या शिलेदाराचे गंभीर आरोप

Vasant More Slams Bharat Gogawale: वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजा आणि रश्मी वहिनींवरील विधानावरून सडकून टीका केली. ठाकरे बंधुंच्या युतीबाबातही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टीव्ही

रश्मी ठाकरे यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांचं नेहमी ऐकतात अशी टीका शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी २ दिवसांपूर्वी केली होती. आता यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी गोगावले यांच्यावर निशाणा साधत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घरात "अघोरी" पूजा केली असून याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करणार असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत.

वसंत मोरे म्हणाले, "भरत गोगावले यांच्या अकलेच्या निघालेले दिवाळे. रश्मी वाहिनी यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहे. गोगावले यांना प्रश्न आहे १७ ऑक्टोबर २०२४ रोजी बगलामुखी मंदिरातून पुजारी कशाला आणले होते? ज्या पूजा घातल्या त्या कशाला घातल्या? गोगावले यांनी ११ पुजारी बोलावून त्यांच्याकडून कशाला पूजा केली. बाहेर राज्यातून मांत्रिक आणायचे आणि पूजा घालायच्या."

'निवडणूक होण्याच्या आधी गोगावले यांनी घरी अघोरी पूजा कशाला घातल्या. ओम फट स्वाहा जे करतात त्यांना आणलं जातं. महाराष्ट्रातले अनेक नेते तिथे जातात १५ लाख रुपये एका पूजेला लागतात असा', आरोप सुद्धा वसंत मोरे यांनी केला आहे.

'महाराष्ट्रात जे अघोरी प्रकार घडतात, बगलामुखी हा अघोरी प्रकार आहे. निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होती, १ महिना आधी ही पूजा त्यांच्या घरात घातल्या गेली होती. आता अशा पूजा जर होणार असतील तर आम्ही याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याबाबत तक्रार करू', असंही मोरे म्हणाले.

ठाकरे बंधू एकत्र येणार का?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र येणार अशा जोरदार चर्चा सुरू आहेत. यावर वसंत मोरे म्हणाले, " महाराष्ट्रातील संपूर्ण मनसैनिक आणि शिवसैनिक यांचे म्हणणे आहे की दोन्ही सेना एकत्र आल्या पाहिजेत. राज्यात येत्या निवडणुकीसाठी हा प्रयोग नक्कीच केला पाहिजे. एक पाऊल शिवसेनेने पुढे टाकलं आहे. आता येत्या गणेशोत्सवात याचा श्रीगणेशा झाला पाहिजे', अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT