autopsy 
महाराष्ट्र

शवविच्छेदनासाठी मृतदेह बारा– बारा तास पडून; मोजावे लागताय अडीच हजार रूपये

शवविच्छेदनासाठी मृतदेह बारा– बारा तास पडून; मोजावे लागताय अडीच हजार रूपये

चेतन इंगळे

वसई– विरार : वसईत पोलीस व डॉक्टरांच्या समन्वयाच्या अभावामुळे बारा बारा तास मृतदेह शवविच्छेदनासाठी पडून राहत आहे. यामुळे नातेवाईकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. विशेष म्‍हणजे शवविच्छेदन करण्यासाठी अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत.

वसई विरार महानगरपालिका हद्दीत शवविच्छेदन करण्यासाठी कटर नसल्यामुळे नातेवाईकांना अडीच हजार रूपये मोजावे लागत असून सुद्धा शव घेण्यासाठी रात्रंदिवस ताटकळत उभे राहावे लागत आहे. पोलीस आणि डॉक्टर यांच्यात समन्वय नसल्याने नातेवाईकांचे हाल होत आहे. सोमवारी दुपारी बारा वाजता कृष्णमूर्ती कोक्कुला याच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर तुळींज पोलीस ठाण्यात त्यांना ताटकळत ठेवण्यात आले. तसेच शवविच्छेदन करणाऱ्या खाजगी इसमाकडून अडीच हजार रुपये घेतले असल्याचे सुदर्शन यांनी सांगितले.

पद रिक्‍तमुळे द्यावे लागताय पैसे

नालासोपारा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करणारे पद रिक्त असून शवविच्छेदन करण्यासाठी अडीच हजार रुपये घेतले जात आहेत. याबाबत डॉ. अनंत कुलकर्णी यांनी पोलीस आल्याशिवाय आम्ही शवविच्छेदन करू शकत नसल्याचे सांगितले.

आरोग्‍य केंद्र मनपाकडे हस्‍तांतरीतच नाही

वसई विरार महानगरपालिका होऊन दहा वर्षे लोटली. तरी प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकेत हस्तांतरित झाले नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दिवसाला तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी येत असतो. याठिकाणी पालिकेने किंवा महाराष्ट्र शासनाने कटरची भरती केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना हजार रुपये मोजावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT