Vasai Fort Leopard Saam tv
महाराष्ट्र

Vasai Fort Leopard : वसई किल्ल्यातील बिबट्या २५ दिवसानंतर अडकला पिंजऱ्यात

Vasai News : वसई किल्ला परिसरात बिबट्या असल्याचे समजल्यानंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. यासाठी येथे पिंजरा देखील लावण्यात आला होता

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे
वसई
: पाणी व शिकारीच्या शोधात वस्तीच्या परिसरात आलेल्या बिबट्यामुळे परिसरात दहशत पसरली होती. (Vasai) वसई किल्ल्यात शिरलेल्या या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून (forest Department) मागील २५ दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. दरम्यान हा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला आहे. (Tajya Batmya)

उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगल भागातून वन्य प्राणी पाणी किंवा शिकारीच्या शोधात शहर, वस्तीच्या भागात येत असतात. अशाच प्रकारे वसई किल्ला परिसरात एक बिबट्या आला होता. या बिबट्याने एका मोटरसायकलला धडक दिली होती. तेव्हापासून (Leopard) बिबट्या वसई किल्ल्यात लपला होता. यामुळे किल्याच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिक जीव मुठीत धरून राहत होते, मात्र अनेक जाणकारानी बिबट्याच नाही; असे मत देखील व्यक्त केलं होत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२५ दिवसांनंतर पिंजऱ्यात 

वसई किल्ला परिसरात बिबट्या असल्याचे समजल्यानंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. यासाठी येथे पिंजरा देखील लावण्यात आला होता. मागील २५ दिवसापासून वन विभाग बिबट्याचा शोध घेत होते. मात्र बिबट्या किल्ल्यातील भुयारात लपला होता. भुयाऱ्याच्या दोन्ही बाजूला पिंजरा लावण्यात आला होता. पहाटे पाणी किवा शिकारीसाठी बाहेर येण्याचा प्रयत्न करताना बिबट्या आज पहाटे ३.३० च्या सुमारास पिंजऱ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT