Vasai News Saam tv
महाराष्ट्र

Vasai : वसईत गॅस सिलेंडरचा काळाबाजार; घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा प्रकार

Vasai News : सिलेंडरचे ब्लॅक मार्केट करत अधिक दराने विक्री केली जाते. यातून रिक्षा, कार मध्ये अवैधपणे गॅस भरला जात असल्याचे सातत्याने समोर आले आहे. पुरवठा विभाग तसेच पोलीस प्रशासनाकडून अनेकदा कारवाई

Rajesh Sonwane

मनोज तांबे 

वसई : घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार अनेकदा समोर आला आहे. यातच वसईच्या राजोडी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीर पणे भरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान हा प्रकार आल्यानंतर पुरवठा विभागाने उघड केला असून काळाबाजार करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. 

घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार केला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. प्रामुख्याने सिलेंडरचे ब्लॅक मार्केट करत अधिक दराने विक्री केली जात असते. याच माध्यमातून रिक्षा तसेच कार मध्ये अवैधपणे गॅस भरला जात असल्याचे सातत्याने समोर आले आहे. पुरवठा विभाग तसेच पोलीस प्रशासनाकडून अनेकदा कारवाई करण्यात येत असताना देखील हा अवैध प्रकार थांबलेला नाही. अशात वसईमध्ये पुन्हा काळाबाजार समोर आला आहे. 

गुन्हा दाखल करत दोन जणांना घेतले ताब्यात  

वसईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये अवैधपणे गॅस भरणा केला जात होता. हा प्रकार पुरवठा विभागाने उघडकीस आणला असून या कारवाईत ५२ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर दोन आरोपी अटक असल्याची माहिती अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे. 

६ लाख ३३ हजाराच्या मुद्देमाल हस्तगत 

दरम्यान या कारवाईत ५२ सिलेंडर, इलेक्ट्रीक वजन काटा, इलेक्ट्रिक मोटार व रबरी पाईप तसेच पिकप टेम्पो असा ६ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT