Vasai East Kaman Spanish Villa Cluster 9 Bungalow Youth End His Life Saam Tv News
महाराष्ट्र

कार्बन मोनॉक्साईड इनसाईड, डोन्ट स्वीच ऑन लाईट; मृतदेह सिलेंडरला बांधला, वसईत तरुणाने विचित्र प्रकारे जीव दिला

Vasai Spanish Villa Cluster 9 Bungalow Youth Suicide : श्रेयने कार्बन मोनॉक्साईडचे दोन सिलेंडर दोन्ही हाताला बांधून डोक्यात हेल्मेट घातलं होतं. गॅस सिलेंडरला एक नळी जोडली आणि ती नळी श्वसनासाठी तोंडात धरली होती.

Prashant Patil

वसई : मुंबई पश्चिमधल्या वसई शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसईत राहणाऱ्या एका तरुणाने कार्बन मोनॉक्साईड सिलेंडरमधील वायू प्राशन करुन विचित्र पद्धतीने आत्महत्या केल्याचा आगळावेगळा प्रकार बुधवारी उघडकीस आला. श्रेय अग्रवाल (वय २७) असं या तरुणाचं नाव आहे. कामण येथील स्पॅनिश व्हिला परिसरातील क्लस्टर ९ या बंगल्यात बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सिलेंडरसोबत बांधलेला आढळला. विशेष म्हणजे स्फोट होऊ नये म्हणून त्याने खिडक्या बंद केल्या होत्या तसेच चिकटपट्टी लावून धोक्याची सूचना एका चिठ्ठीत लिहून ठेवली होती.

श्रेय अग्रवाल हा तरुण वसई पूर्वच्या कामण परिसरात असलेल्या स्पॅनिश व्हिला येथील क्लस्टर ९ या बंगल्यात मागील एक वर्षांपासून भाड्याने राहत होता. दोन दिवसांपासून त्याच्याशी संपर्क होत नसल्याने श्रेयच्या बहिणीने मुंबई पोलीस आयुक्तांना ईमेलद्वारे भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार केली. मुंबई गुन्हे शाखेने त्याचा तपास सुरू केला. त्याच्या मोबाईलचे लोकेशन काढले असता ते वसईच्या कामण येथे आढळून आले. मुंबई गुन्हे शाखेने याबाबत नायगाव पोलिसांना माहिती दिली. नायगाव पोलीस त्याचा फोटो घेऊन तो राहत असलेल्या बंगल्यात पोहोचले. या बंगल्यात मागील एक वर्षांपासून तो राहत असल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली.

पोलीस बंगल्यात गेले तर बंगला पूर्ण बंद होता आणि कुबट वास येत होता. त्याआधी दारातच इंग्लिशमध्ये सावधगिरीची सुचना देणारी चिठ्ठी लावलेली आढळली. संपूर्ण घरात कार्बन मोनॉक्साईड पसरला असून दिवे लावू नका अन्यथा स्फोट होईल (कार्बन मोनॉक्साईड इनसाईड..डोन्ट स्वीच ऑन लाईट) असं इंग्लिशमध्ये लिहून ठेवलला मजकूर होता. नायगाव पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. त्यांनी हायड्रोलिक स्प्रेडर कटरच्या साह्याने बेडरूमचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला.

श्रेयने कार्बन मोनॉक्साईडचे दोन सिलेंडर दोन्ही हाताला बांधून डोक्यात हेल्मेट घातलं होतं. गॅस सिलेंडरला एक नळी जोडली आणि ती नळी श्वसनासाठी वापरला जाणार्‍या नॅब्युलाईझरद्वारे तोंडात धरली होती. त्याद्वारे विषारी कार्बनमोनॉक्साईड गॅस शरीरात ओढून घेतला होता. अग्निशमन दलाने सावधानपूर्वक परिस्थिती हाताळून त्याच्या तोंडातली नळी चाकूने कापली आणि त्या सिलेंडरच्या जोडणी पासून वेगळं केलं. त्याचे शरीर सुजले होते. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT