Vasai Crime Saam tv
महाराष्ट्र

Vasai Crime : वसईत ‘बंटी बबली'ची करामत; सिने स्टाईलने दुकानातून दागिन्यांची अनोखी चोरी

Vasai News : दुकानात अमृता सकपाळ हिने सेल्सगर्ल म्हणून नोकरी मिळवली. एकूण दुकानात ५० पेक्षा अधिक नोकर वर्ग असून अमृता देखील ग्राहकांना सोन्याचे दागिने दाखवण्याचे काम करायची

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे

वसई : वसईत एका सराफ दुकानात अनोख्या पध्दतीने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. सिनेमात लोकांना (Vasai) फसवून गंडा घालणारी बंटी- बबली नावाची जोडी चांगलीच प्रसिध्द झाली होती. अशाच प्रकारे तरुणीने सुरुवातीला सराफाच्या दुकानात नोकरी मिळवली. नंतर मित्राच्या मदतीने शक्कल लढवून चोरी (Theft) केली. मित्र ग्राहक म्हणून दुकानात येतो आणि नकली चैन देऊन असली पावणेदोन लाखांचा हार घेऊन लंपास करतो. सध्या ही बंटी आणि बबलीची जोडी फरार झाली असून पोलिस (Police) त्यांचा शोध घेत आहे. (Live Marathi News)

अमृता सकपाळ (वय २६) आणि विनोद मर्चंडे असं या चोरी करणाऱ्या तरुण तरुणीचे नाव आहे. नायगाव येथील तनिष्क या प्रसिद्ध ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात अमृता सकपाळ हिने सेल्सगर्ल म्हणून नोकरी मिळवली. (Crime News) एकूण दुकानात ५० पेक्षा अधिक नोकर वर्ग असून अमृता देखील ग्राहकांना (Gold) सोन्याचे दागिने दाखवण्याचे काम करायची. दोन महिन्यात दुकानातील सर्व माहिती घेऊन तिचा मित्रा विनोद मर्चंडे यांच्या सोबत चोरी करण्याचा डाव तिने आखला आणि दुकानात चोरी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ती चैन पसंतीला पडली व उघड झाली चोरी 
दरम्यान विनोद हा दुकानात ग्राहक म्हणून येऊन अमृताशी संपर्क साधत चोरी करून निघून जातो. मात्र या दोघांना वाटले की,आपली चोरी कुणी पकडू शकत नाही. मात्र एका ग्राहकाने एक सोनसाखळी पसंद केली होती. ती ग्राहकाला देण्यापूर्वी तपासणीमध्ये त्यावर हॉलमार्क नसल्याचे आढळले. तपासणीत ती नकली असल्याचे समजले आणि एकच खळबळ उडाली. नकली सोनसाखळी दुकानात आलीच कशी असा प्रश्न पडला आणि धावपळ सुरू झाली. अखेर सीसीटीव्हीमध्ये ११ एप्रिल २०२४ रोजी हा प्रकार दिसून आला. मात्र तो पर्यंत अमृताही काम सोडून पसार झाली होती.

तनिष्क ज्वेलर्सचे व्यवस्थापक नितीन मौर्य यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी अमृता सकपाळ आणि विनोद मर्चंडे या दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे मालाडच्या अप्पापाडा परिसरात राहणारे आहेत. दोघांनी संगनमत करून चोरीची योजना बनवली होती. आम्ही त्यांना लवकरच अटक करू असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

SCROLL FOR NEXT