Vasai Police Saam tv
महाराष्ट्र

Vasai Police : मद्यधुंद पोलिसांकडून तरुणीचा विनयभंग; नागरिकांनी दिला चोप, पोलीस प्रशासनात खळबळ

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे 

वसई : वसईच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलिसांकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या पोलिसांनी मद्यप्राशन केले असताना हे कृत्य केले असून स्थानिक नागरिकांनी विनयभंग करणाऱ्या पोलिसांना चांगलाच चोप दिला आहे. 

देवगड (Devgad) तालुक्यात हा धक्कादायक प्रकार २५ सप्टेंबरला घडला आहे. दरम्यान देवगड तालुक्यातील जामसांडे गावातील आनंदवाडी वळणावर एक १८ वर्षीय तरुणी हि घरी जात होती. यावेळी गोव्याला सहलीसाठी निघालेल्या पाच पोलीस मद्यपान करुन या तरुणीची छेड काढली. यामध्ये तरुणीला (Vasai Police) पोलीस शिपाई हरिनाम गीते याने एकटी पाहून ‘माझ्या सोबत येते का? तुला वसई फिरवतो; असे म्हणत छेड काढली. तर अन्य पोलिसांनी या प्रकाराची टिंगलटवाळी केली.

नागरिकांनी दोघांना दिला चोप 
सदर प्रकार घडल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी पाहिला. यानंतर दोन पोलीस (police) कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी चांगला चोप दिला आहे. स्थानिकांनी मारहाण केल्याचा वीडियो समोर आला आहे. मात्र तीन जण कार घेऊन फरार झाले. मात्र त्यांना देवगड पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान वसई वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या हरिनाम मारुती गीते आणि प्रविण विलास रानडे यांच्यवर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. पोलिसांकडून विनयभंग झाल्याच्या या घटनेने मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलिस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: आनंद दिघेंना बाळासाहेबांपेक्षा वर नेण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप

Earbuds blast in woman ear : एअरबड्सचा झाला कानात स्फोट; महिला झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं?VIDEO

Fact check : 2030 सालापर्यंत माणूस अमर होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Kriti Sanon: क्रिती सेनॉनचा स्वॅगच न्यारा, दिसते खूपच कमाल

Devendra Fadnavis Office : मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक; गृहमंत्र्यांच्या ऑफिसबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीस म्हणाले... VIDEO

SCROLL FOR NEXT