Vasai News
Vasai News Saam TV
महाराष्ट्र

Vasai Waterfall News : वसईचा चिंचोटी धबधबा ठरतोय जीवघेणा, २४ तासात ३ पर्यटकांचा मृत्यू

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Vasai News : वसई येथील चिंचोटी धबधब्याजवळील नदीत बुडून मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात तीन तरुणांचा इथे मृत्यू झाला आहे. १३ जुलै रोजी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी दोन तरुणांचा मृत्यू झाला. चिंताजनक बाब म्हणजे पावसाळा सुरु झाल्यापासून आतापर्यंत येथे ८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी मुंबई येथे राहणाऱ्या तरुणाचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला. तर शुक्रवारी नालासोपारा येथील सहा मित्र चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. यातील दोन जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे.  (Maharashtra News)

मृतांची नावं

रोहन राठोड आणि रवी झा मृत तरुणांची नावं आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. (Tajya Marathi Batmya)

पावसाला सुरु झाला की पर्यटकांचे पाय निसर्गरम्य स्थळी वळतात. वसई विरारच्या समुद्रकिनाऱ्यावर तसेच तुंगारेश्वर आणि चिंचोटी येथील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे ही ठिकाणं धोकादायक बनू लागली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Cucumber Benefits: चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय; एकदा करुन बघाच

शेतकरी हळहळले! विजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यु,10 लाखांचे नुकसान

Kothimbir Vadi: पावसाळ्यात बनवा खमंग, कुरकुरीत कोथिंबीर वडी; हटके रेसीपी

Pandharpur Drought : पाणी नसल्याने द्राक्षबाग सुकली; दुष्काळामुळे बाग काढण्याची शेतकऱ्यांवर वेळ

SCROLL FOR NEXT