Varandha Ghat Closed Saam Digital
महाराष्ट्र

Varandha Ghat Closed: वरंध घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत बंद; मोठं कारण आलं समोर

Varandha Ghat : रायगड आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा वरंध घाट 31 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वहातुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

Sandeep Gawade

रायगड जिल्ह्यात गेले काही दिवस अतिमुसळधार पाऊस झाला होता. या पावसात पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या वरंध घाटात दरड कोसळून रस्ता खचला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. याची दखल घेत रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मार्ग बंद करण्याची अधिसूचना करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वहातुकीसाठी मार्ग बंद करण्यात आला आहे.

पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यास दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा प्रकारच्या घटना घडल्याने जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. सद्य:स्थितीत वरंध घाटातून प्रवास करणाऱ्या तसेच मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग 31ऑगस्ट 2024 पर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तशी अधिसूचना जारी केली आहे. प्रवासी आणि पर्यटकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

SCROLL FOR NEXT