Vande Bharat Sleeper Coach Saam Tv
महाराष्ट्र

Vande Bharat Sleeper : नागपूर-मुंबई फक्त १० तासांवर, तब्बल ६ तासांचा वेळ वाचणार, तिकिटाची किंमतही समोर

Nagpur to Mumbai Vande Bharat : नागपूर ते मुंबई यादरम्यान लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. आरामदायी आणि हायस्पीड ट्रेनमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Nagpur to Mumbai Vande Bharat Sleeper Train : नागपूर ते मुंबई यादरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांचा वेळ वाचणार आहे, त्याशिवाय प्रवास आरामदायी होईल. नागपूर रेल्वे विभागाकडून दोन वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठीचा प्रस्ताव केंद्रीय बोर्डाकडे पाठवला आहे, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. नागपूर-मुंबई वंदे भारत स्लीपर सुरू झाल्यास सहा तासांचा वेळ वाचणार आहे. हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस नागपूरवरून मुंबईला अवघ्या दहा तासांत पोहोचेल, असा अंदाज वर्तवला जातोय.

नागपूर-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेन -

नागपूर-मुंबई या रेल्वे प्रवासाला एक्सप्रेस ट्रेनने १६ तासांचा अवधी लागतो. सुपरफास्ट एक्सप्रेसला १३ ते १४ तास लागतात. तर दुरंतो एक्सप्रेसने १२ ते १३ तासांत नागपूर-मुंबई प्रवास होतो. वंदे भारत स्लीपर ट्रेनने हा प्रवास अधिक वेगवान होईल. नागपूर-मुंबई हे अंतर वंदे भारत स्लीपर ट्रेनने फक्त १० तासांत पूर्ण होईल. म्हणजेच, नागपूर-मुंबई हे प्रवासाचे अंतर ५ ते ६ तासांनी कमी होईल.

मुंबई-नागपूर फक्त दोन ट्रेन -

नागपूर-मुंबई प्रवासासाठी रेल्वेच्या मर्यादीत ट्रेन आहेत. विदर्भ एक्सप्रेस आणि सेवाग्राम एक्सप्रेस या दोन ट्रेन फक्त नागपूर ते मुंबई यादरम्यान धावतात. प्रवाशांची संख्या जास्त आहे, पण ट्रेन कमी आहेत. त्यामुळे अनेकजण रस्ते मार्गाने प्रवास करतात, त्यासाठी जास्त वेळ लागतो. पण वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यास वेळ आणि पैसे वाचेल.

तिकिट किती असेल? ticket price for the Vande Bharat Express from Nagpur to Mumbai

नागपूर ते मुंबई यादरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचं तिकिट अद्याप अधिकृत जाहीर झालेले नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, १५०० ते ३००० यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट असेल. कोणत्या बोगीचे तुम्ही तिकीट काढता, त्यानुसार किमत मोजावी लागणार आहे. नागपूर ते मुंबई यादरम्यान कमीत कमी १५०० रूपयांचे तिकिट असण्याची शक्यता आहे. ३ हजार ते ४ हजार रूपये जास्तीत जास्त तिकिटाची किंमत असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

SCROLL FOR NEXT