Narendra Modi, Prakash Ambedkar  saam tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar :'वंचित'ला 'इंडिया आघाडी'त घेतले नाही तर माेदी... ; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Vanchit Bhaujan Aghadi Satara Sabha : आज वंचितने सातारा येथे गांधी मैदानावर सभा आयाेजित केली आहे.

ओंकार कदम

Vanchit Bhaujan Aghadi : इंडिया आघाडीत आम्ही जायला तयार आहे पण वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यास तयार नाहीत असे मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar In Satara) यांनी आज (शनिवार) साताऱ्यात व्यक्त केले. सातारा येथे वंचितने आयाेजिलेल्या सभेसाठी आंबेडकर हे सातारा येथे आले हाेते. या सभेपूर्वी आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra News)

प्रकाश आंबेडकर म्हणाले इंडिया आघाडीत नेमका विरोध शरद पवारांचा आहे की भाजपचा हे मला माहिती नाही पण आम्हांला जर इंडिया आघाडीत घेतले नाही तर नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) इंडिया आघाडी ठेवणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त एनसीपीच्या भुमीकेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले. राष्ट्रवादी काॅंग्रेस इंडियाच्या भुमिकेसोबत दिसत नाही, अडाणींच्या अर्थव्यवस्थे सोबत एनसीपी आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

इंडिया मध्ये ख-या अर्थानं नॅरेटीव्ह लोकांसमोर आलं‌ पाहिजे असे आंबेडकर यांनी नमूद केले. ते म्हणाले इंडीया मधील काही जण धाडस करतात पण काही जणांना थांबवण्याचा निर्णय यामध्ये दिसतोय. मुंबईत झालेल्या इंडियाच्या बैठकीत अडाणीची अर्थव्यवस्था देशाला धोकादायक आहे अशी भुमिका मांडण्याचा प्रयत्न केला.

या बैठकीत इंडियाचा सगळ्या घटकांनी पाठींबा दिला परंतु एनसीबी ही या इंडियाच्या भुमिकेसोबत आपल्याला दिसत नाही. एनसीपीने अडणींसोबत आहे असं दाखवुन दिल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election : इंजिनाचा वेग मंदावला! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

SCROLL FOR NEXT