Relatives of slain sarpanch Santosh Deshmukh demand justice as accused Valmik Karad seeks bail in High Court. Saam Tv
महाराष्ट्र

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडनं जामीनासाठी न्यायालयात धाव घेतलीय... मात्र त्याचवेळी कराडच्या समर्थकांकडून आरोपीची हत्तीवरून मिरवणुक काढण्याची भाषा केली जातेय... नेमकं प्रकरण काय आहे? न्यायालयात देशमुखांच्या वकीलांनी काय युक्तीवाद केला?

Suprim Maskar

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आता एक वर्ष पूर्ण झालायं... मात्र अद्याप या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याला पोलिसांनी अटक केलेली नाहीय... तर दुसरीकडे याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी धाव घेतलीय... मात्र न्यायालयाच्या सुनावणीआधीच धनंजय देशमुखांनी कराड समर्थकांवर गंभीर आरोप केलेत....

दरम्यान आरोपी वाल्मिक कराडच्या सुटकेनंतर हत्तीवरून मिरवणुक काढण्याच्या अफवेवरून कराडला कुणाचा राजाश्रय आहे, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय... अशातच सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील वकिलांनीही आरोपीला जामीन देऊ नये, असा युक्तीवाद न्यायालयात केलाय... तसचं कराडबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी धनंजय देशमुखांनी केलीय....

कराडच्या जामीनावर न्यायालय काय आदेश देते? .याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. संतोष देशमुखांच्या हत्येने समाजमन सुन्न झालं. बीडमधील गुन्हेगारी समोर आली. त्याचे राजकीय पडसादही उमटले. मात्र एव्हढं होऊनही आरोपीचे समर्थक मिरवणूक काढण्याची भाषा करत असतील...तर महाराष्ट्राचा बिहार झालाय का? असा सवाल उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

SCROLL FOR NEXT