Vaishnavi Hagawane Death Remand Report  Saam Tv News
महाराष्ट्र

Vaishnavi Hagawane Death Case: महिला आयोग झोपलं होतं का? अध्यक्षा रुपाली चाकणकर संतापाची लाट

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवीच्या मृत्यूनंतर महिला आयोगाविरोधात संतापाची लाट उसळलीय... मात्र त्याचं कारण काय? महिला आयोगावर टीका का होतीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

हा संताप आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात.मात्र त्याला कारण ठरलाय वैष्णवी हगवणेचा हुंड्यासाठी गेलेला बळी. ज्या नराधमांनी वैष्णवीचा बळी घेतलाय त्यांच्याच घरातली मोठी सून मयुरीनं नोव्हेंबरमध्येच महिला आयोगाकडे तक्रार केली होती.त्यावर वेळीच कारवाई झाली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता.

महिला आयोग झोपलं होतं म्हणूनच वैष्णवीचा जीव गेला का. हाच धागा पकडून वैष्णवीच्या मृत्यूनंतर पवारांच्या राष्ट्रवादीनं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधातच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. मयुरी हगवणेनं नोव्हेंबर 2024 मध्ये तक्रार दिली होती.. त्यामध्ये हगवणे कुटुंबाकडून मारहाण होत असल्याचं स्पष्ट म्हटलं होतं.

मात्र त्यानंतरही राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्यानं महिला आयोगानं या प्रकरणात कारवाई केली नसल्याचा आरोप केला जातोय..मात्र मयुरी प्रकरणी कारवाई का केली नाही याचं काहीच ठोस कारण न देताच वैष्णवीच्या कुटुंबियांनी तक्रारच दिली नसल्याच सांगत. महिला आयोग स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवत असल्याचं चित्र आहे.

जर महिला आयोगानं गुन्हा दाखल केला होता तर पोलीस महानिरीक्षक जालिंधर सुपेकरने दबाव आणला होता का? असा प्रश्न दमानियांनी उपस्थित केलाय. महिला आयोगाची स्थापनाच मुळी महिलांवरील अत्याचाराची चौकशी करणं आणि त्यांना कायदेशीर आणि सामाजिक मदत करण्यासाठी करण्यात आली आहे, मात्र आतापर्यंत राज्य महिला आयोगाचा कारभार पाहता स्वपक्षातील नेत्यांच्या विरोधात तक्रार आली तर बोटचेपी भूमिका आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात तक्रार आली तर तातडीनं कारवाईची भूमिका असाच राहिला आहे.

प्राजक्ता माळी बदनामी प्रकरणी धसांविरोधात तातडीने कारवाईचे आदेश

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी वक्तव्य केल्यानं राणेंविरोधात कारवाईचे आदेश

धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांचे आरोप, चाकणकरांकडून थंड प्रतिसाद

एकीकडे चित्रा वाघ यांनी महिला अत्याचारप्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आरोपांचं रान उठवलं होतं. मात्र तेच संजय राठोड सध्या सरकारमध्ये आले आणि वाघांची भूमिका मवाळ झाल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्याकडूनही सत्ताधारी नेत्यांविरोधात ठोस भूमिका घेतली जात नसल्याचं दिसून येतंय.. त्यामुळे महिला आयोग स्वपक्षातील नेत्यांना वाचवण्यासाठी आहे की खरोखरच महिलांच्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी असा प्रश्न निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Asthma: अस्थमाची लक्षणे कोणती? अशी घ्या काळजी

Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? चाहत्यांमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT