शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे मोठे व्यक्ती आहेत. ते साठ ते सत्तर वर्षे राजकारणामध्ये आहेत. 2019 मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली त्याच्या अगोदर देखील शरद पवार राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झाले होते. त्यांची मुसद्दीगीरी आपल्याला माहीत होती त्यामुळे 2019 मध्ये युती करताना विचार केला पाहिजे होता. आता मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर पवार जर सत्कार करत असतील तर आता बोलून काय उपयोग नाही असे म्हणत ठाकरेंचे कोकणातले निष्ठावंत शिवसैनिक माजी आमदार वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला.
नुकतंच शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांचे भरभरून कौतुक केले. त्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका करत, पवारांचं हे कृत्य रुचलं नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन आता वैभव नाईक यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.
राजन साळवी हे खरे जुने शिवसैनिक होते.
राजन साळवी यांच्याशी मी स्वतः बोललो तुम्ही शिवसेनेत राहा. आज वेळ वाईट असली तरी उद्या वेळ बदलेल. राजन साळवी यांनी सांगितल की पक्षांतील लोकांचा माझ्यावर विश्वास नाही. मी विधानपरिषदेला मतदान केलं नसल्याचं काहींचं म्हणणं असल्याचं राजन साळवी यांनी सांगितले. राजन साळवी पक्षात राहिले पाहिजे होते. कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक हे सामान्य घरातील असून, जनतेने त्यांना निवडून दिलं होतं. मात्र सत्ताधारी पक्षाकडून लाखो रुपयांचे आमिष दाखवून त्यांना फोडण्यात येत आहे. गेलेले नगरसेवक हे स्वतःच्या स्वार्थासाठी, आर्थिक फायद्यासाठी गेले. येणाऱ्या काळात सामान्य शिवसैनिकांना घेऊन शिवसेना उभी करू असंही वैभव नाईक म्हणाले.
नारायण राणेंनी विरोधकांना संपवलं आता नितेश राणे ही तेच करत आहे.
तुमचे वडील वीस वर्षांपूर्वी पालकमंत्री होते त्यांनी देखील विरोधकांना असेच संपवण्याचे काम केलं. अनेक जिल्हा परिषद नगरसेवक फोडले निधी देणार नाही म्हणून दीपक केसरकर यांना डीपीडीसी मिटिंगच्या बाहेर घालवण्यात आलं. मात्र ही परिस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त दिवस टिकत नाही ही वस्तूस्थिती आहे असं वैभव नाईक म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.