vaibhav naik, nitesh rane, grampanchayat election, sarpanch saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी माझ्या खिशात, यालाच म्हणतात सत्तेचा माज'

सत्ता मिळून सहा महिन्यांत मंत्रीपद न मिळाल्याने राणे व्यथित आहेत असेही आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Nitesh Rane News : मतदारांना धमकी देऊन सत्तेचा माज कसा असतो हे नितेश राणेंनी दाखवून दिलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत (grampanchayat election) नितेश राणेंचा पराभव अटळ आहे. नितेश राणेंचे वडील नारायण राणे मुख्यमंत्री होते. त्यांना ही असाच सत्तेचा माज झाला होता, तो माज सिंधुदुर्गच्या जनतेने उतरवला होता अशी टिप्पणी आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांनी भाजप आमदार नितेश राणेंच्या कणकवलीतील वक्तव्यावर केली.

माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही. निधी वाटप आता माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा असा सज्जड दमच आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कणकवली नांदगाव येथील ग्रामपंचायत निवडणुक प्रचारादरम्यान दिला हाेता. त्यावर आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे.

आमदार नाईक म्हणाले राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी हे माझ्या खिशात असल्याचे राणे म्हणत आहेत. यालाच सत्तेचा माज म्हणतात. या निवडणुकांमध्ये (election) आम्ही जिंकूच. त्यांचा पराभव अटळ असल्याने त्यांचा त्रागा हाेत आहे. त्यांचा माज निश्चित जनता उतरवेल असा विश्वास नाईक यांनी नमूद केला. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलं

सिन्नरमध्ये मतदानावेळी वाद; अजित पवारांच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रे हल्ला, २ गटात तुफान हाणामारी|VIDEO

Alibaug Travel : अलिबागमध्ये लपलेले सुंदर रत्न, निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मी आणि समरजीतसिंह घाडगे एकत्र आलो - मंत्री हसन मुश्रीफ

Winter Joint Pain: हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? हे घरगुती उपाय करा

SCROLL FOR NEXT