Chhatrapati Sambhajinagar Latest News Saamtv
महाराष्ट्र

UPSC Prelims Exam 2024: गुगल मॅपचा घोळ, UPSC परीक्षेपासून विद्यार्थी वंचित! ३ मिनिटे उशिर झाल्याने प्रवेश नाकारला

Chhatrapati Sambhajinagar Latest News: छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर घडला. वर्षानुवर्ष तयारी करुन परीक्षेला मुकावे लागल्याने तरुण- तरुणींना रडू कोसळले.

Gangappa Pujari

राम ढाकणे| छत्रपती संभाजीनगर, ता. १६ जून २०२४

गुगल मॅपवर चुकीचे लोकेशन दाखवल्याने अनेक विद्यार्थ्यांना युपीएससी परीक्षेपासून वंचित राहिल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर घडला. वर्षानुवर्ष तयारी करुन परीक्षेला मुकावे लागल्याने तरुण- तरुणींना रडू कोसळले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज संपूर्ण देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरू होती. छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद महाविद्यालयातही ही परीक्षा होणार होती. बाहेरील जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी येणार होते. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर दिलेल्या कॉलेजच्या पत्त्याचा घोळ झाल्याने आणि गुगल मॅपवर चुकीचे लोकेशन दाखवल्याने अनेकांना परीक्षेस मुकावे लागले.

या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गेटवर 2 ते 3 मिनिटे उशिरा आल्याने त्यांना परीक्षेस बसण्यासाठी प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यानंतर या विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाल्याच पाहायला मिळाले.

गुगल मॅपवर या कॉलेजचे नाव वाळूज पंढरपूर येथे असल्याचही दाखवत असल्याने हे विद्यार्थी वाळूज पंढरपूरला गेले होते. मात्र तिथे हे कॉलेज अस्तित्वात नाही आणि कुठलीही परीक्षा देखील चालू असल्याचे निदर्शनास आले नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरी चप्पल जगभर पोहोचली; इटलीतील ग्राहकाने मोजले 51 हजार

Akola Accident: अकोल्यात 407 टेम्पोचा भीषण अपघात, दोन शेतमजुरांचा जागीच मृत्यू

खरी शिवसेना कुणाची? विधानसभेत ठाकरेसेना–शिंदेसेना आमनेसामने

12 हजारांचं तिकीट, पण पदरी निराशाच; मेस्सीमुळे कोलकत्यात गोंधळ

19 Minute 34 Seconds Viral Video Link : 19 मिनिटांचा व्हायरल MMS VIDEO खरा की खोटा? महत्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT