Untimely Rain In Maharashtra  Saam Tv
महाराष्ट्र

Untimely Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, सरकार मदत करणार का?

राज्यात आज, मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात अनेक ठिकणी रिमझिम तर काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस एक तास पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Untimely Rain In Maharashtra : राज्यात आज, मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात अनेक ठिकणी रिमझिम तर काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस एक तास पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारंबळ उडाली. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान आज, मंगळवारी बीड, अमरावती, परभणी, वर्धा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.

अवकाळी पावसाने राज्यातील काही भागात वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात खरीब हंगामासह रब्बीतील पिकांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.

परभणीत देखील अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसामुळे खरीपातील काढणीस आलेल्या कापूस पिकांचे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे कापूस पिकासह भाजीपाला वर्गातील पिकांचं देखील काही प्रमाणात नुकसान झालं आहे. पावसादरम्यान, अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडीत झाला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळं कपाशी, भाजीपाला वर्गीय पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं. पावसादरम्यान वीज पुरवठा खंडीत झाला होता. जिल्ह्याच्या सर्वच भागात ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

SCROLL FOR NEXT