Cabinet Decision : शेतजमिनीबाबत मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय; एकूण 16 निर्णयांचा कुणाला होणार फायदा?

जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam TV

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. (Eknath Shinde)

तसेच जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार आहेत. (Latest Marathi News)

मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?

>> जळगांव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार. २२२६ कोटी सुधारित खर्चास मान्यता.

>> आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार.

>> खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड.

Eknath Shinde
Maharashtra Politics : अखेर हिवाळी अधिवेशनाची फायनल तारीख ठरली; किती दिवस चालणार अधिवेशन? वाचा...

>> राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणार.

>> गगनबावडा आणि जत तालुक्यात मौजे संख येथे होणार ग्राम न्यायालय.

>> शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना. नाममात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क आकारणारा.

>> राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू होणार. कोकणातील शेतकऱ्यांना होणार फायदा.

>> शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ. वाचनसंस्कृतीला मिळणार बळ.

>> कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणार. कालबाह्य तरतुदी काढणार. कारावासाऐवजी वाढीव दंडाची तरतूद.

>> १३ सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासनाने बँकेस देय असलेली रक्कम अदा करणार.

Eknath Shinde
Sharad Pawar : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सिल्वर ओकवर फोन आल्याने खळबळ

>> पुणे जिल्ह्यातील आंबेगांव बु. येथील शिवसृष्टी प्रकल्पास ५० कोटी अनुदान देणार.

>> स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार.

>> पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, कर्जत या स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठांना मान्यता.

>> महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी. ईज ऑफ डुईंग बिझिनेसाठी निर्गुन्हेगारीकरण करणार.

>> राज्यातील शाळांना अनुदान. ११०० कोटींना मान्यता.

>> महाअधिवक्ता श्री आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com