Nagpur : मोठी बातमी! सीबीआयची आयकर विभागावर 'धाड'; कारण एकून हादरून जाल

नागपुरातून मोठं वृत्त समोर आली आहे. सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभाग) आयकर विभागावर मोठी धाड टाकली आहे.
File Photo
File Photo Saam Tv
Published On

Nagpur News : नागपुरातून मोठं वृत्त समोर आली आहे. सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभाग) आयकर विभागावर मोठी धाड टाकली आहे. या कारवाईत सीबीआयने आयकर विभागाच्या ९ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सीबीआयच्या कारवाईनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सीबीआयच्या कारवाईनंतर राज्यातील एक मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

File Photo
Video: शाळेच्या बसचे स्टेअरिंग मद्यपीच्या हाती; नवी मुंबईतील उलवेमधील धक्कादायक घटना समोर

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात (Nagpur) सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आयकर विभागात डमी उमेदवार बसवून नोकरी मिळवणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. हे सर्व कर्मचारी आयकर विभागात स्टेनोग्राफर आणि एमटीएस या पदावर २०१४ पासून कार्यरत होते. या संदर्भात २०१८ मध्येच सीबीआयने प्रकरण दाखल केला होता. त्याच प्रकरणाच्या तपास पूर्ण करत आयकर विभागातील नऊ कर्मचाऱ्यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

File Photo
Chandrakant Patil: शाईफेक प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींवरील कलम ३०७ मागे घेण्याचे फडणवीसांंचे आदेश: सूत्रांची माहिती

काय आहे प्रकरण?

२०१४ च्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेत ९ जणांनी परीक्षेत स्वतः न बसता डमी उमेदवार बसवून स्टाफ सिलेक्शनची आणि आयकर विभागाची फसवणूक केली होती. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर २०१८ मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. त्याच तपासात सीबीआयने या सर्व नऊ कर्मचाऱ्यांनी स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेत लिहिलेली उत्तरपत्रिका, त्यावरील त्यांचे हस्ताक्षर, स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे यांचा सखोल फॉरेन्सिक तपास केला.

या परीक्षेत भरलेले आणि प्रत्यक्ष परीक्षा देताना ठसे आणि हस्ताक्षर यात तफावत असल्याचा निष्कर्ष पर्यंत तपास पोहचला. त्यानंतर सीबीआय हे सर्व कर्मचारी डमी उमेदवार बसवून परीक्षेत उत्तीर्ण झाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचली. त्यानंतरच आयकर विभागातील या नऊ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com