unseasonal rain hits sambhajinagar yavatmal and nagpur Saam Digital
महाराष्ट्र

Unseasonal Rain: संभाजीनगर, यवतमाळ, नागपूरसह बुलढाण्यात वादळी वा-यासह पाऊस, आंब्यासह फळभाज्यांचे नुकसान

या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना देखील या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

Siddharth Latkar

- माधव सावरगावे, संजय राठाेड, पराग ढाेबळे, संजय जाधव

छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, नागपूरसह बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात आज (गुरुवार) वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे आंब्याचे नुकसान झाल्याचे शेतक-यांनी सांगितले. (Maharashtra News)

गंगापूर, खुलताबाद, पैठणला पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात आज अवकाळी पाऊस झाला. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे आंबा आणि शेतीमध्ये असलेल्या फळभाज्यांना फटका बसला आहे.

दरम्यान गेल्या दोन आठवड्यापासून तापमानाचा पारा ४० च्या वर गेल्याने उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र पावसामुळे दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील गंगापूर, खुलताबाद आणि पैठण तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याचे शेतक-यांनी सांगितले.

यवतमाळला अवकाळी पावसाचा तडाखा

यवतमाळच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटसह पाऊस काेसळू लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे उकाड्यापासून यवतमाळकरांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना देखील या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Special Recipe : उपवासाला टिफिनसाठी बनवा रताळ्याचा 'हा' पदार्थ, दिवसभर पोट भरलेले राहील

Budget Smartphones: स्वस्तात मस्त! २०,००० पेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन

Marathi Serial Update : तीन मराठी मालिकांचा महासंगम; खोट्याचा होणार पर्दाफाश, तारीख अन् वेळ आताच नोट करा

Government Scheme: सरकारी योजनांचे पैसे ९० दिवस बँकेत ठेवल्यास परत जमा होणार, लाडकीला फटका बसणार?

Maharashtra Live News Update: सगावच्या गौरी हत्तीणीसाठी वनताराकडुन 3 कोटींची आली होती ऑफर

SCROLL FOR NEXT