अंशकालीन महिला कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

अंशकालीन महिला कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : शासनाच्या आरोग्य विभागात अंशकालीन कर्मचारी म्हणून तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या जिल्ह्यातील अडीचशे महिला आज आपल्या विविध मागण्यांसाठी रायगड जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला Agitation बसले आहेत. राज्यभर अंशकालीन महिलांचे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यत हे धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचा पावित्रा या महिलांनी घेतला आहे.

हे देखील पहा-

आरोग्य विभागातील परिचरिकसोबत अंशकालीन महिला कर्मचारी अर्धवेळ पदावर काम करीत आहेत. या महिला कर्मचाऱ्यांना शासनाकडून अवघे तीन हजार रुपये मानधन दिले जात आहे. मात्र तेही वेळेत मिळत नाही. कोरोनाच्या या संकटात अंशकालीन महिला ह्या गाववड्यावर जाऊन परिचारिका सोबत अँटीजन तपासणी, लसीकरण, तपासणी ही कामे करीत आहेत.

कोरोनाच्या Corona या काळात अनेक महिलांना कोरोनाची लागणही झाली. काही साथीदार याचे कोरोनाने मृत्यू ही झाला मात्र फ्रंट वर्कर दर्जा या महिला कर्मचाऱ्यांना नसल्याने शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही तीस वर्षे नोकरी करून भविष्यनिधीही नाही. तीन हजार रुपयात घर चालवायचे कसे हा प्रश्नही त्यांना सतावत आहे.

प्रवास भत्ताही शासनाकडून दिला जात नाही. आरोग्य विभागात काम करूनही साधे ओळखपत्र, ड्रेसकोड ही दिला नसल्याने समाजात त्याची ओळखच नाही अशी भावना महिलांनी यावेळी व्यक्त केली आहे.

आम्हालाही किमान वेतन 18 हजार द्यावे, नियमित सेवेत कायम करावे, अंशकालीन अर्धवेळ नावात बदल करावा, रिक्तपदावर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना प्राधान्य द्यावे, पेन्शन योजना लागू करावी, कोव्हिडं प्रोत्साहन भत्ता द्यावा, विमा कवच देण्यात यावे, चादरी धुलाई भत्ता द्यावा, शासनाने आम्हाला ओळख द्यावी या प्रमुख मागण्यासाठी या महिला कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन केले आहे. यावेळी महिला कर्मचारी देत असलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT