unmesh patil criticized girish mahajan on dcc bank work  Saam Digital
महाराष्ट्र

Girish Mahajan: उन्मेष पाटील काहीही बरळतात, गिरीश महाजनांनी आराेप फेटाळले

शेतकऱ्यांच्या लुबाडणूक करण्याला जसे हे नेते जबाबदार आहेत तशाच पद्धतीने त्यांना त्या पदावर बसविणारे मंत्री गिरीश महाजन देखील या गँगचे प्रमुख आहेत असे पाटील यांनी म्हटले.

Siddharth Latkar

- संजय महाजन / अभिजीत साेनावणे

जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या लुटारू गँगचे प्रमुख गिरीश महाजन असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यवर केला आहे. दरम्यान उन्मेष पाटील यांच्या आराेप मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावताना पाटील यांच्या डाेक्यावर परिणाम झाल्याचे नमूद केले. (Maharashtra News)

उन्मेष पाटील म्हणाले पीक विमा असो की कर्ज पूर्नगठण असो यामधे शेतकऱ्यांची जिल्हा बँक फसवणूक करत आहे. या जिल्हा बँकेत फसवणूक करणारे नेते हे मंत्री गिरीश महाजन यांनी तोड फोडचे राजकारण करून बसवलेले नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लुबाडणूक करण्याला जसे हे नेते जबाबदार आहेत तशाच पद्धतीने त्यांना त्या पदावर बसविणारे मंत्री गिरीश महाजन देखील या गँगचे प्रमुख आहेत असे पाटील यांनी म्हटले.

निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा समस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले.आता निवडणूक संपली असल्याने तातडीने बॅंकेने शेतकऱ्यांसाठी पीक विमा मिळण्यासाठी, कर्ज मिळण्यासाठी, भाव मिळण्यासाठी काम केले पाहिजे. अन्यथा शेतकऱ्याचा उद्रेक पाहायला मिळेल अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली. शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा उन्मेष पाटील यांनी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाजनांनी पाटलांचे आराेप फेटाळले

दरम्यान उन्मेष पाटील यांचे सर्व आराेप गिरीश महाजन यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना काही तरी वेड्या सारखे बडबड करायची सवय लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

Maharashtra News Live Update: नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

SCROLL FOR NEXT