Buldhana: ज्वारी खरेदीच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप, नोंदणी कार्यालयात तुडुंब गर्दी

आता बरेच शेतकरी संस्थेत नोंदणीसाठी येत आहेत. परंतु शासनाची ज्वारी नोंदणीची वेबसाईट तांत्रिक कारणामुळे वेळोवेळी बंद पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
buldhana farmers complaints jowar kharedi website runs slow
buldhana farmers complaints jowar kharedi website runs slow Saam Digital

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शेतकी खरेदी-विक्री संघातर्फे हमीभाव खरेदीच्या ज्वारीच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. यामुळे ज्वारी पीक पेरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान शासकीय निकषांमुळे ज्वारी उत्पादक शेतक-यांना ज्वारी नाेंदणी करताना अडचणी जाणवू लागल्या आहेत. शासनाने निकषांत बदल करावेत अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत. (Maharashtra News)

ज्या शेतकऱ्यांच्या नावाने शेती आहे आणि ज्वारी पेरलेली आहे तोच शेतकरी ज्वारीच्या नोंदणी करता हजर लागत आहे. यामुळे संस्थेत ज्वारीची नोंदणी करण्याकरता महिलावर्ग, वयोवृद्ध व लहान मुले उन्हाळ्याच्या दिवसांत सुद्धा हजर होताना दिसत आहेत.

शेगाव शेतकी खरेदी विक्री संस्थेचे कामकाज सकाळी 10 पासून चालू होत असून संध्याकाळी पाचला बंद होत आहे. या 10 ते पाच च्या वेळे ऑनलाइन संकेतस्थळ काही तांत्रिक कारणामुळे सातत्याने बंद पडत् आहे.

buldhana farmers complaints jowar kharedi website runs slow
Bhubaneswar Pune Special Train: पुणेकरांनाे! भुवनेश्वर-पुणे रेल्वे सोलापूरपर्यंतच धावणार, जाणून घ्या कारण

त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे. संपूर्ण शेतकऱ्यांचं पिकाच ऑनलाईन नोंदणी करण्याकरता संस्थेत फक्त एकच संगणक आहे. युजर आयडी असल्यामुळे काम कमी व संस्थेत शेतकऱ्यांची गर्दी जास्त झालेली दिसत आहे. शेतकऱ्यांमधून नोंदणी करता यूजर आयडी वाढवण्याची मागणी होताना दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

buldhana farmers complaints jowar kharedi website runs slow
Melghat Water Scarcity: मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी आदिवासींचा जीवघेणा संघर्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com