लातूर: देशाच्या स्वातंत्र्याला (Independence) वर्षे पूर्ण ७५ झाल्यानिमित्त 'अमृत महोत्सवा' अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. लातूर (Latur) पोलिस दलाच्या वतीने १४ ऑगस्टला सकाळी ७ वाजता लातूर शहरात एकता दौड आयोजित करण्यात आली आहे. (Latur Latest News)
हे देखील पाहा -
या एकता दौडमध्ये लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले ४०० पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश असणार आहे. तसेच पोलीस ट्रेनिंग स्कूल बाभळगाव, लातूर व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेणारे खाजगी इन्स्टिट्यूटमधील तरुण सहभागी होणार आहेत. ही एकता दौड पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथून सुरू होऊन शाहू चौक, गंजगोलाई, मज्जिद रोड, सुभाष चौक, बालाजी मंदिर, रेणापूर नाका परत छत्रपती शिवाजी चौक, गांधी चौक, जुना गुळ मार्केट, शाहू चौक मार्गे निघून शेवटी विवेकानंद चौक येथे पूर्ण होणार आहे. एकता दौडमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या तीन पुरुष व तीन महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सदरच्या एकता दौडमध्ये इतर नागरिक व महिला सुद्धा सहभागी होऊ शकतात.
एकता दौड मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याकरिता वाहतूक पोलिसांची तसेच चार्ली पोलीस पेट्रोलिंग कार्यान्वित करण्यात येणार आहे. नागरिकांनी एकता दौडमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.