Social Media: दहशतवादाला समर्थन करणाऱ्या पोस्ट वाढल्या; सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय

Mumbai Cyber Crime: चालू वर्षात मुंबई पोलिसांनी जवळपास 750 पोस्ट डिलीट केल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
Mumbai Cyber Crime
Mumbai Cyber CrimeSaam TV
Published On

मुंबई: सोशल मीडियाचा (social Media) वापर अनेक समाजविरोधी कारवाया करण्यातदेखील होत आहे. दहशतवाद (Terror) किंवा दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणार्‍या सोशल मीडियावरील या पोस्ट सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनल्या आहेत. दहशतवादाचे समर्थन अथवा दहशतवादाला प्रोत्साहन किंवा प्रचार करणाऱ्या पोस्ट सायबर गुन्हे शाखेच्या माध्यमातून हटवल्या जातात. मुंबई पोलिसांनी यावर्षी दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांचे समर्थन करणाऱ्या अनेक पोस्ट हटवल्या आहेत. चालू वर्षात मुंबई पोलिसांनी जवळपास 750 पोस्ट डिलीट केल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. (Mumbai Cyber Crimen News)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या पोस्ट दहशतवादी किंवा दहशतवादी संघटनेचे समर्थन करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट आहेत. गेल्या वर्षी अशा सोशल मीडिया पोस्टची संख्या 404 होती ज्या मुंबई पोलिसांनी हटवल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अशा सोशल मीडिया पोस्टचे प्रमाण वाढत असल्याची चिंता मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. अशा पोस्टमुळे समाजात अशांतता निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. याशिवाय अल्पवयीन आणि तरुणांवर अशा सोशल मीडिया पोस्टचा नकारात्मक परिणाम होतो. यामुळे अशा सोशल मीडिया पोस्ट डिलीट करण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com