अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांचे गाढव पुजून अनोखे आंदोलन
अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांचे गाढव पुजून अनोखे आंदोलन अॅड. जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांचे गाढव पुजून अनोखे आंदोलन

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोल्यामध्ये आज एसटी कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. अकोल्यात आगार क्रमांक १ वरील एसटी कर्मचाऱ्यांनी बसस्थानक परिसरात गाढवाचे पूजन करून मिरवणूक काढली आहे. गेल्या 30 दिवसापासून राज्यासह अकोल्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

हे देखील पहा-

दररोज कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत मागणी पूर्ण करण्यासाठी ठाम आहेत. अकोल्यात आज पर्यंत एकही बस आगरच्या बाहेर गेली नसून आंदोलन करत सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज अकोल्यातील आगार क्रमांक १ वरील एसटी कर्मचाऱ्यांनी बसस्थानक परिसरात गाढवांना आणून त्यांची आरती ओवाळून पूजन करण्यात आले आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी गाढवाची मिरवणूक काढत घोषणाबाजी करण्यात आली आहे.

जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. आधीच कोरोनामुळे एसटी महामंडळ तोट्यात गेले आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांनी मागील ४ आठवडे एसटी पूर्णपणे बंद ठेवल्यामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात राज्यातील प्रवाशांनाही प्रवासासाठी अडचणी येत आहेत. यामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यासाठी सर्व प्रयत्न केले होते. मात्र, तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT