मुंबईकरांसाठी मोठी बातमी; कोरोनाचे नियम न पाळल्यास 50 हजारांपर्यंतचा दंड

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना निर्बंधांमध्ये अनेक शिथिलता दिल्यानंतर राज्य सरकारने शनिवारी कोरोना साथीच्या संदर्भामध्ये नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले
मुंबईकरांसाठी मोठी बातमी; कोरोनाचे नियम न पाळल्यास 50 हजारांपर्यंतचा दंड
मुंबईकरांसाठी मोठी बातमी; कोरोनाचे नियम न पाळल्यास 50 हजारांपर्यंतचा दंडSaam Tv

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना निर्बंधांमध्ये अनेक शिथिलता दिल्यानंतर राज्य सरकारने शनिवारी कोरोना साथीच्या संदर्भामध्ये नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहेत. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांकडून अधिक शिक्षा करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. कोरोना नियमांचे पालन न केल्यास, प्रत्येक प्रकरणात संस्था किंवा आस्थापनेवर ५०,००० रुपये दंड आकारला जाणार आहे.

हे देखिल पहा-

मार्गदर्शक तत्त्वांचे ठळक मुद्दे-

• लसीकरण आवश्यक: सर्व आयोजक आणि कोणत्याही कार्यक्रमात तिकीटासह किंवा तिकीट नसलेल्या सहभागींसाठी लसीकरण आवश्यक असणार आहे.

दुकाने, मॉल्स, फंक्शन्स, कॉन्फरन्स आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवास करण्याकरिता संपूर्ण लसीकरण आवश्यक आहे. युनिव्हर्सल पास व्यतिरिक्त, फोटोसह कोविड प्रमाण पत्र देखील यासाठी पुरावा असणार आहे. १८ वर्षांखालील मुलांसाठी शाळेने जारी केले असलेले ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणास्तव लसीकरण न झालेल्यांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र

• महाराष्ट्रात प्रवेश : परदेशामधून राज्यामध्ये येणाऱ्या सर्व लोकांसाठी केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे लागू असणार आहेत. घरगुती प्रवाशांसाठी संपूर्ण लसीकरण किंवा RT-PCR चाचणी अहवाल ७२ तासांसाठी वैध असणे आवश्यक राहणार आहे.

बंद खोल्या, थिएटर, मंगल हॉलमध्ये कोणताही कार्यक्रम आयोजित केला असल्यास, स्थळाच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी असणार आहे. ज्या ठिकाणी क्षमता निश्चित नाही. क्षमता निश्चित करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला असणार आहेत.

कोणत्याही सभेला उपस्थित राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या १ हजार पेक्षा जास्त असल्यास, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचित करण्यात येणार आहे आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अशा कोणत्याही बैठकीचे पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवावेत.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी; कोरोनाचे नियम न पाळल्यास 50 हजारांपर्यंतचा दंड
अलीकडे साहित्य संमेलनात देखील राजकारण वाढले- विनायक मेटेंचा हल्लाबोल

कोणताही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोणत्याही वेळी, योग्य वाटल्यास, त्यांच्या संबंधित अधिकार क्षेत्रात निर्बंध वाढवू शकणार. सार्वजनिक सूचना जारी केल्याशिवाय प्राधिकरणाचे आदेश ४८ तासांपेक्षा जास्त काळ लागू होणार नाहीत.

नेहमी योग्य प्रकारे मास्क घाला. नाक आणि तोंड नेहमी मास्कने झाकले पाहिजे. रुमाल हा मुखवटा मानला जाणार नाही. मास्क म्हणून रुमाल बांधणारे शिक्षेस पात्र असणार आहेत. नेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) ठेवा. स्वच्छ साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार हात धुवा. कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, तसेच संस्था, आस्थापना, आचारसंहितेचे पालन न करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शिक्षेस पात्र असणार आहेत. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांना १० हजार रुपयांपर्यंतचा दंड देखील ठोठावला जाणार आहे.

कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक इत्यादी कोविड आचारसंहितेचे पालन करत नाहीत, याची नियमितपणे खात्री करण्यात अपयशी ठरल्यास, अशी संस्था किंवा आस्थापना कोविड-19 ची अधिसूचना लागू होईपर्यंत बंद करण्यात येणार आहे.

कोणतीही संस्था किंवा आस्थापना स्वतःच कोविड अनुपालन पद्धतींचे पालन करण्यात अपयशी ठरल्यास प्रत्येक प्रकरणात ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

टॅक्सी किंवा खाजगी चारचाकी आणि बसमध्ये कोरोना नियमांचे पालन न केल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. याबरोबरच सेवा देणाऱ्या चालक, सहाय्यकाला ५०० रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात येणार आहे. बसच्या बाबतीत, दंडाची रक्कम प्रत्येक वेळी १० हजार रुपये असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com