प्राची कुलकर्णी
Ramdas Athawale News : राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांनी गणेश मंडळ, घरगुती गणपतीच्या दर्शन सुरू केले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील पुणे दौऱ्यावर असताना विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या.
'अखिल मंडई शारदा गणेश मंडळाने मुस्लिम समाजाच्या हस्ते आरती करून शिरमुर्खाचा प्रसाद ठेवला होता. मंडळाचा हा निर्णय समाजात आदर्श निर्माण करणार आहे. त्यामुळे पुण्यातील गणेशोत्सव हा सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. त्यावेळी अखिल मंडई मंडळाने त्यांचा विशेष सन्मान केला त्यावेळी आठवले बोलत होते .
रामदास आठवले पुढे म्हणाले, 'लोकमान्य टिळकांनी टिळकांनी गणेशोत्सव सुरू करून स्वातंत्र्य लढ्यात सर्व धर्म, जात व समाजाला एकत्र करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली किंवा कोरोना सारखी संकट आले तेव्हा पुण्यातील गणेश मंडळांनी पुढाकार घेतला होता. पुण्यातील गणेश मंडळे लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावून जातात. हे सर्व समाजासाठी व देशासाठी आदर्श मानलं पाहिजे'. आखिल मंडई शारदा गणेश मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी आठवले यांचा विशेष सन्मान करण्यात आला .
रामदासजी आठवले यांनी यांनतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ तसेच शहरातील विविध श्री गणेश मंडळांना सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सीमा आठवले देखील उपस्थित होत्या. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अॅड.मंदार जोशी यांनी आखिल मंडई शारदा गणेश मंडळांच कार्य व इतिहास सांगितला .
तसेच रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे , रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी , प्रदेश सचिव परशुराम वाडेकर , असित गांगुर्डे तसेच अखिल मंडई मंडळाचे प्रमुख पदाधिकारी व पुणे शहरातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.