Dombivali News : आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीटवर सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. हा नियम सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. गडकरी यांच्या या निर्णयानंतर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी रस्त्याच्या दुरवस्थेवरून त्यांचे लक्ष वेधले आहे.
डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून, आमदार राजू पाटील यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत असलेल्या ठेकेदार आणि आधिकाऱ्यांना खड्ड्यामध्ये ओणवे उभे करण्याची तरतूद करा, अशी मागणी ट्विट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी आज, बुधवारी रस्त्याच्या दुरवस्थेवरून पुन्हा एक ट्विट केलं आहे. आज केलेले हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत रस्त्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत असलेल्या ठेकेदार आणि आधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभे करण्याची तरतूद करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे हे ट्विट आता चर्चेत आले आहे.
गणेशोत्सव सुरू होऊन आता ७ दिवस उलटून गेले आहे.तरी कल्याण,डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत.याच खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.याच परिस्थितीवरून डोंबिवली श्रीकांत देव या गणेश भक्ताने चक्क आपल्या लाडक्या बाप्पासाठी देखावा तयार केला. यात बाप्पा होडीत विराजमान असून वर्षांनुवर्षे कायम असलेले दोन प्रश्न,समस्या देखाव्यात सादर केल्या आहेत.
डोंबिवलीकरांना भेडसवणाऱ्या महत्वाच्या समस्या म्हणजे लोकलमधील गर्दी आणि रस्त्यावरील खड्डे या विषयावरून बाप्पाचे आणि उंदीर मामाचे संभाषण देखाव्यात सादर केले होते.तर आता मनसे आमदार यांनी ट्विट करत रस्त्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत असलेल्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभे करण्याची तरतूद करा अशी मागणी केली आहे. त्यामुळे त्यांचे ट्विट आता चर्चेत आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.