Political News Saam tv
महाराष्ट्र

Political News: रामदास आठवलेंचा शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा; शिंदे गट जागा सोडणार का?

Maharashtra Political News: शिंदे गट हा रामदास आठवलेंना जागा सोडणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे

Ahmednagar News: आगामी लोकसभेच्या निवडणुकीचे अनेकांना वेध लागले आहे. अनेक राजकीय पक्षांनी आत्तापासूनच या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. सध्या या मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आहेत. यामुळे शिंदे गट हा रामदास आठवलेंना जागा सोडणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले काल अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वयोश्री योजनेच्या साहित्य वाटप कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मंचावर खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे आणि खासदार रामदास आठवले हे एकाच मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आठवले यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा करत रामदास आठवले म्हणाले, 'माझी राज्यसभा २०२६ पर्यंत आहे. सदाशिव लोखंडे आमचे मित्रच आहेत. सदाशिव लोखंडे आले तरी ते आपलेच आहेत. मी आलो तरी आपलाच आहे. २०२४ ला शिर्डीच्या खासदरकीचे काय करायचे ते बसवून ठरवू'.

विरोधी पक्षांच्या बैठकीवर आठवले म्हणाले, 'सतरा विरोधक एकत्र आले काय आणि शंभर आले काय... त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. जेवढे जास्त एकत्र येतील, तेवढी लोकप्रियता मोदींची वाढणार आहे. विरोधक एकट्या पंतप्रधान मोदींच्या विरोधात आकंडतांडव करत आहेत'.

मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार - आठवले

'मोदी सर्वांना न्याय देण्याचं काम करत आहेत. विरोधकांची मोदी हटाव अशी भूमिका आहे. तर आमची भूमिका विरोधक कटाव, अशी आहे. आपल्या खास शैलीत आठवलेंनी विरोधी पक्षांवर टीका केली . २०२४ ला मोदीच पंतप्रधान होतील आणि साधारण ३५० जागा मिळतील, असा दावा आठवले यांनी यावेळी केला.

राज्यातील राजकारणावर भाष्य करताना आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची साथ सोडायला नको होती. त्यात मला बाजूला उभं केलं असतं तर एवढे आमदार फुटले नसते. त्याचबरोबर त्यांच्यावर ही गंभीर परिस्थिती आली नसती. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं त्यांचा नाईलाज आहे. उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली पाहिजे. ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापासून दूर चालले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

SCROLL FOR NEXT